Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

योग करून सांभाळा 'आर्थिक आरोग्य'!

yoga day 2022

शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. गुंतवणुकीला जेवढ्या लवकर सुरूवात कराल तेवढा चांगला आणि दीर्घकाळ निश्चित फायदा मिळू शकतो.

हल्ली बऱ्यापैकी लोक हे वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेताना दिसतात. या काळजीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांच्याबद्दल फार चर्चा केली जाते. पण एक आरोग्य असेही आहे, ज्याची काळजी घेतली नाहीतर तुमचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य बिघडवू शकेल. ते आरोग्य म्हणजे आर्थिक आरोग्य!आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त (International yoga day 2022) आज आपण आर्थिक आरोग्याविषयी (Financial Health) चर्चा करणार आहोत. जिम किंवा इतर जड व्यायाम प्रकाराने तुमच्या शरीरावर तात्पुरते परिणाम दिसतात. पण जर तुम्ही योगा करीत असाल तर त्याचा दीर्घकाळ परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावर दिसत असतो. तसेच आर्थिक आरोग्याचे आहे. जेवढ्या लवकर तुम्ही योग सुरु कराल तेवढा चांगला आणि दीर्घकाळ फायदा तुम्हाला होणार आहे. योगाचा आपल्या आर्थिक आरोग्यासोबत कसा संबंध आहे ते पाहूया.

आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Information 2022)

दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा (Yoga day 2022 celebration) केला जातो. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो. जर मन शांत असेल तर योग्य आर्थिक तसेच व्यावहारिक निर्णय घेणे सोपे जाते.

संयम महत्त्वाचा

योग आपल्याला एक गोष्ट शिकवते ती म्हणजे संयम. तुम्ही फक्त एकदा ध्यान करून तुमचे मन शांत करू शकत नाही. त्याचा लाभ घेण्यासाठी सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराची मानसिकता असणे आवश्यक आहे. तरुण गुंतवणूकदारांना अनेकदा गुंतवणूक केल्यावर त्वरित समाधानाची इच्छा असते. पैसे तुमच्यासाठी काम करण्यासाठी, तुम्हाला परतावा पाहण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीबाबत संयम बाळगणे आवश्यक आहे. सुरुवातीला थोडा संयम आणि हळूहळू शिकण्याची प्रक्रिया तुम्हाला शेवटी चांगला परिणाम देईल. एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना, तुम्ही त्यांची गुंतवणूक ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या कालावधीला चिकटून राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठत नाही तोपर्यंत सराव सुरू ठेवा. तुम्ही मध्ये थांबल्यास, तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकत नाहीत. एसआयपी आणि दीर्घकालीन गुंतवणूक एखाद्या व्यक्तीसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. यासाठी संयम फार महत्वाचा आहे.

समतोल राखणे 

योगामुळे आपल्या शरीरात संतुलन साधण्यात मदत होते. आसन करताना स्वतःचा समतोल साधण्याचा सतत प्रयत्न केल्याने केवळ आपले शरीरच नाही तर आपले मन आणि आत्मा देखील संतुलित होतो. त्यामुळे आपल्याला शांतता वाटते. चांगला समतोल राहिल्याने आपला पडण्याचा किंवा घसरण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. इक्विटी आणि कर्ज यांच्यात चांगला समतोल असण्यामुळे मोठ्या नुकसानापासून संरक्षण मिळते आणि दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते.

international yoga day 2022

प्रवाह वाढवते

इतर व्यायाम प्रकारांच्या तुलनेत योगा मंद आहे.  योगासने सातत्याने केल्याने केवळ रक्तप्रवाह सुधारतो असे नाही तर हार्मोन्सचे नियमन आणि मानसिक शांती मिळविण्यातही मदत होते. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला नियमितपणे चांगल्या प्रमाणात रक्त मिळणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला व्यवसाय आणि जीवन चालू ठेवण्यासाठी नियमित रोख प्रवाह आवश्यक आहे. कर्जाची पुर्तता करण्यास, पुनर्गुंतवणूक करण्यास, सर्व खर्च भरण्यास आणि आकस्मिक परिस्थितींसाठी निधी राखून ठेवण्यास सक्षम करते. उत्पन्न आणि खर्चाचे सातत्याने निरीक्षण आणि मागोवा ठेवल्याने आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात मदत होते

एकाग्रता महत्त्वाची 

योगामध्ये योग्य आसन करण्यासाठी एकाग्रता लागते. एकाग्रतेने मानसिक आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे, आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला विचलित होण्यापासून आणि तुमच्या ध्येयांपासून दूर जाण्यापासून रोखते. तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्याने शेवटी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होते.

शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्य हातात हात घालून जाते. गुंतवणूक करताना योगाभ्यास करा आणि परतावा आणि चांगले आर्थिक आरोग्य मिळवा.