Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahindra & Mahindra : महिंद्राची 5 इलेक्ट्रिक वाहने होणार लाँच; 5000 कोटींची गुंतवणूक करणार

Mahindra EV

भारतातील सर्वात मोठी स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (SUV) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. तसेच निधीसाठी कंपनीकडून जागतिक गुंतवणूकदारांशी बोलणी सुरू आहेत. त्याच वेळी, कंपनीकडून 2025 पर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहन खरेदीच्या बाबतीत महिंद्राच्या वाहनांना भारतीयांकडून प्राधान्य दिले जाते. या कंपनीकडून वेळोवेळी ग्राहकांच्या मागणीचा विचार करून वाहनांच्या लूक आणि ब्रँडमध्ये बदल करण्यात आला आहे. थार, स्कॉर्पिओ, या सारख्या एसयूव्ही वाहनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, महिंद्राकडून आता इलेक्ट्रिक वाहन (electric vehicle) निर्मिती क्षेत्रात ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिंद्रा कंपनी एकाच EV प्लॅटफॉर्मवर 5 एसयूव्ही मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महिंद्राच्या ग्राहकांचा यापुढे इंधनावरील खर्च वाचणार आहे.

भारतातील सर्वात मोठी स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (SUV) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. तसेच निधीसाठी कंपनीकडून जागतिक गुंतवणूकदारांशी बोलणी सुरू आहेत. त्याच वेळी,  कंपनीकडून 2025 पर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

5000 कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन युनिट(EV) 2025 पर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. यासाठी कंपनीकडून या युनिटसाठी आणखी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII) आणि इतर काही जागतिक गुंतवणूकदारांशी महिंद्रा समुहाने बोलणी सुरू केली आहेत. महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सवरील चर्चा अनुकूल ठरल्यास ब्रिटिश फायनान्सर दुसऱ्यांदा महिंद्रा समुहामध्ये गुंतवणूक करेल, असेही उद्योग समुहाकडून सांगण्यात आले आहे. ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII) ने यापूर्वी जुलै 2022 मध्ये महिंद्रा इलेक्ट्रिकसोबत 1,925 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला होता.

इलेक्ट्रिक वाहनांचे दोन ब्रँड

महिंद्राची एप्रिल ते ऑक्टोबर 2025 दरम्यान 5 नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही वाहने लाँच करण्याची योजना आहे. ही इलेक्ट्रिक वाहने एक्सयूवी(XUV) आणि बीई (BE) या ब्रँड अंतर्गत लाँच होतील. यामध्ये बीई ब्रँड हा केवळ ईलेक्ट्रिक वाहनांसाठींचा ब्रँड म्हणून ओळखला जाईल आणि  हा ब्रँड नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. XUV या ब्रँड अंतर्गत दोन  ई-एसयूवी लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये XUV.e8 हे वाहन डिसेंबर 2024 पर्यंत तर XUV.e9 हे मॉडेल एप्रिल 2025 पर्यंत बाजारात दाखल होणार आहे. या शिवाय BE ब्रँडमध्ये BE.05, BE.07, BE.09 या तीन मॉडेलसह एकूण 5 इलेक्ट्रिक वाहने लाँच केली जाणार आहेत. तसेच महिंद्राकडून INGLO या प्लॅटफॉर्मवर थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरोच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या देखील लाँच करण्याचे नियोजन आहे.