Mahindra Thar Started Selling In Large Numbers: कार प्रेमी लोकांमध्ये महिंद्रा कंपनीच्या गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे. महिंद्रा कंपनीच्या गाड्यांचा दमदारपणा, आधुनिक वैशिष्टये, नवीन फिचर्स यामुळे या कंपनीच्या गाड्या नागरीकांच्या पसंतीस उतरतात. त्यात थार मॉडेल नागरिकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले आहे. एप्रिल 2023 मध्ये थारच्या एकूण 5302 युनिट्सची विक्री झाली. तर मार्च 2023 मध्ये थारच्या 5008 युनिटची विक्री झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थार मॉडेलमध्ये वाढ होतांना दिसत आहे. मुख्य म्हणजे एप्रिल 2023 मध्ये पसंतीच्या बाबतीत थारने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
Table of contents [Show]
स्कॉर्पिओचा दबदबा कायम
महिंद्रा कंपनीने एप्रिल 2023 मध्ये, जास्तीत जास्त स्कॉर्पिओ एन मॉडेलची विक्री केली. कंपनीने एप्रिल महिन्यात एकूण 9617 युनिट्सची विक्री केली. तर मार्च 2023 मध्ये सुमारे 8788 युनिट्सची विक्री झाली. तसेच मार्च 2022 मध्ये कंपनीने स्कॉर्पिओ एन मॉडेलची 2712 युनिट्सची विक्री केली. त्यामुळे वार्षिक आधारावर 254.61 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
बोलेरो दुसऱ्या क्रमांकावर
बोलेरो मॉडेलचा विक्रीच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागला आहे. महिंद्रा कंपनीने एप्रिल 2023 मध्ये बोलेरो मॉडेलच्या एकूण 9054 युनिट्सची विक्री केली, तर एप्रिल 2022 मध्ये कंपनीने बोलेरोच्या 7686 युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच वार्षिक वाढ 17.30 टक्के दिसून येते. मार्च 2023 मध्ये बोलेरोच्या एकूण 9546 युनिट्सची विक्री झाली. मार्च महिन्यातील विक्री ही एप्रिल 2023 पेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.
महिंद्रा XUV 300
महिंद्रा कंपनीच्या XUV 300 बाबत बोलायचे झाल्यास, तर एप्रिल 2023 मध्ये एकूण 5062 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे विक्रीच्या बाबतीत महिंद्रा XUV 300 चौथ्या क्रमांकावर आहे. मार्च 2023 मध्ये XUV 300 च्या एकूण 5128 युनिट्सची विक्री झाली होती.
महिंद्रा XUV 700
महिंद्रा XUV 700 विक्रीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. एप्रिल 2023 मध्ये XUV 700 च्या एकूण 4757 युनिट्सची विक्री झाली. तर मार्च 2023 मध्ये, XUV 700 ची एकूण विक्री 5107 टक्के होती. म्हणजेच एक महिन्याच्या अंतराने विक्रीमध्ये 6.85 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
महिंद्रा XUV 400 च्या विक्रीत घट
महिंद्रा XUV400 यादीत सहाव्या स्थानावर कायम आहे. एप्रिल 2023 मध्ये एकूण 902 मॉडेल्सची विक्री झाली आहे. तर मार्च महिन्यात एकूण 1909 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच महिनाभरात 52 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. महिंद्रा कंपनीच्या मराझोने एप्रिल महिन्यात एकही युनिट विकले नाही. मार्च महिन्यात या मॉडेलच्या सुमारे 490 युनिट्सची विक्री झाली होती.