Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Price of Mahindra Thar : महिंद्रा थारची किंमत 50 हजार रुपयांनी वाढली

Price of Mahindra Thar

Image Source : www.gaadiwaadi.com

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही थारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये महिंद्रा थारची रीअर-व्हील-ड्राइव्ह (RWD) आवृत्ती देशात लॉन्च केली. AX डिझेल, LX डिझेल आणि LX पेट्रोल या एकूण 3 पर्यायांमध्ये हे लॉन्च करण्यात आले.

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही थारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये महिंद्रा थारची रीअर-व्हील-ड्राइव्ह (RWD) आवृत्ती देशात लॉन्च केली. AX डिझेल, LX डिझेल आणि LX पेट्रोल या एकूण 3 पर्यायांमध्ये हे लॉन्च करण्यात आले. एसयूव्ही (SUV) च्या बेस डिझेल AX(O) आणि LX पेट्रोल AT प्रकारांची किंमत समान आहे. मात्र, हे मॉडेल फक्त हार्डटॉप कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. महिंद्रा थार आरडब्ल्यू डी (Mahindra Thar RWD) आवृत्ती दोन नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे - एव्हरेस्ट व्हाइट आणि ब्लेझिंग ब्रॉन्झ. 4×4 आवृत्तीच्या तुलनेत, थार आरडब्ल्यूडी (Thar RWD) ची किंमत सुमारे 4 लाख रुपये कमी आहे.

महिंद्रा थारची वैशिष्ट्ये

थार आरडब्ल्यूडी (Thar RWD) ला पॉवर्ड, ओआरव्हीएम (ORVM), अँड्रॉईड ऑटो (Android Auto) आणि अँपल कार प्ले (Apple CarPlay) सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि 18-इंच अलॉय व्हील मिळतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडी (EBD) सह एबीएस (ABS), हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट सीट बेल्ट रिमायंडर मिळतात.

महिंद्रा थारचं इंजिन

महिंद्रा थार आरडब्ल्यूडी (Mahindra Thar RWD) प्रकारात 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे. त्याचे 1500cc डिझेल इंजिन 117bhp पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तर थारच्या 4X4 प्रकारात 2.2L इंजिन आहे. थारचा टर्बो पेट्रोल आरडब्ल्यूडी (RWD) प्रकार केवळ 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतो. त्याचे 2.0L टर्बोचार्ज्ड केलेले पेट्रोल इंजिन 150PS पॉवर आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

महिंद्रा थारची नवीन किंमत

महिंद्रा थार आरडब्ल्यूडी (Mahindra Thar RWD)ची किंमत रु.9.99 लाख ते रु.13.49 लाख होती. या किमती सुरुवातीला आणि फक्त पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी लागू होत्या. आता महिंद्राने LX डिझेल मॅन्युअल व्हेरियंटच्या किमती 50 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. या प्रकाराची किंमत आता 11.49 लाख रुपये आहे. सुरुवातीला हे 10.99 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते. महिंद्रा थार आरडब्ल्यूडी एएक्स (Mahindra Thar RWD AX) डिझेलची किंमत पूर्वीप्रमाणेच रु. 9.99 लाख आहे. एलएक्स डिझेल व्हेरियंटची किंमत आता 11.49 लाख रुपये झाली आहे, जी आधी 10.99 लाख रुपये होती. त्याच वेळी, LX पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 13.49 लाख रुपये पूर्वीसारखीच आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Source: https://bit.ly/3Yfrink