Bachat Gat Scheme: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा महामंडळ योजना राबवली जाते. महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध करून दिले जाते.
महिलांना व्यवसाय सुरू करण्यास बँकांमार्फत कर्ज मंजूर करण्यात येते. या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के पर्यंत व्याज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत देण्यात येते.
ग्रामीण भागातील महिलांना सोप्या पद्धतीने पैसा उपलब्ध व्हावा, त्यांना विविध प्रशिक्षण मिळावे, त्यांनी स्वत:चा लघु उद्योग सुरू करावा, या उद्देशाने गावागावांमध्ये बचत गटांची निर्मिती करण्यात आली. अशा या बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत, मागास प्रवर्गातील ज्या गरीब महिला असतील, होतकरू परितक्त्या महिला असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊन त्यांना सर्वांगीणदृष्या सक्षम करणे, हा योजनेचा उद्देश आहे.
योजनेचे स्वरुप
ज्या बचत गटामध्ये कमीत कमी 50 टक्के महिला इतर मागास प्रवर्गातील असतील त्याच बचत गटातील महिलेला महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा लाभ मिळतो.
अशा बचत गटांना पहिल्या टप्प्यामध्ये बँकेकडून 5 लाखपर्यंतचे कर्ज घेण्यास मंजूरी देण्यात येते.
बचत गटाने पहिल्या टप्प्यातील कर्ज वेळेवर परतफेड केल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास पात्र ठरतो.
बँकेकडून जे कर्ज मंजूर होईल, त्या कर्जाचे कमाल 12% टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा OBC महामंडळामार्फत दिला जातो.
कागद पत्रांची पूर्तता
जातीचा दाखला.
जन्म प्रमाणपत्र किंवा वयाचा दाखला.
बचत गटाचे बँक पासबुक.
CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र.
अर्जदार महिलेने कोणत्याही शासकिय योजनेचा लाभ याआधी घेतलेला नसावा.
महिलेचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 60 वर्ष असावे.