Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FDI in Maharashtra : परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वलच; पहिल्या तिमाहीत राज्यात 36,634 कोटींची गुंतवणूक

FDI in Maharashtra : परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वलच; पहिल्या तिमाहीत राज्यात 36,634 कोटींची गुंतवणूक

Image Source : www.india-briefing.com

अनेक विदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात तब्बल 1,18,422 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. त्यावेळी देखील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानी राहिला होता. आता या आर्थिक वर्षातही महाराष्ट्राने आपली आर्थिक विकासाला चालना देणारी परदेशी गुंतवणुकीची घौडदौड चालूच ठेवली आहे

कर संकलनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्यात महाराष्ट्राचा नेहमीच पहिला क्रमांक लागतो. त्याच प्रमाणे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक (foreign direct investment- FDI) आणण्यातही महाराष्ट्राने अव्वलस्थान पटकावले आहे. विविध क्षेत्रातील परकीय गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा प्राधान्याने विचार करतात. याचाच परिणाम म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणे यंदादेखील परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे.

गुंतवणुकीची घौडदौड सुरूच

महाराष्ट्र राज्य औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाकडून आता नवीन उद्योगांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना उद्योगासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) सर्व सोयीसुविधांचा पुरवठा केला जातो. परिणामी अनेक विदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात तब्बल 1,18,422 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. त्यावेळी देखील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानी राहिला होता. आता या आर्थिक वर्षातही महाराष्ट्राने आपली आर्थिक विकासाला चालना देणारी परदेशी गुंतवणुकीची घौडदौड चालूच ठेवली आहे

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पहिल्या स्थानी

दरम्यान, औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या महाराष्ट्र राज्याने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देखील विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात पहिल्या तिमाहीमध्ये गुंतवणुकीना आकर्षिक करण्यात प्रथमस्थानी असून राज्यात सुमारे 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीची डीपीआयआयटीने (Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) या संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

दिल्ली, कर्नाटक, तेलंगणापेक्षा ही जास्त गुंतवणूक

या आकडेवारी नुसार परकीय गुंतवणूक होणाऱ्या राज्यामध्ये  दुसर्‍यास्थानी दिल्ली, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र, या तिन्ही राज्याच्या एकूण गुंतवणुकीच्या आकड्या पेक्षाही महाराष्ट्रात आलेला एफडीआय जास्त आहे.