• 26 Mar, 2023 13:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Budget 2023: जलसिंचन, पाणी प्रश्नाबाबत अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; वाचा कोणत्या जिल्ह्याला काय मिळालं

Maharashtra Budget 2023

राज्यामध्ये शेतीसाठी होणाऱ्या जलसिंचनाचा असमतोल तयार झाला आहे. (Maharashtra irrigation project) तो कमी करण्याचा प्रयत्न सरकारने या बजेटमध्ये केल्याचे दिसून येत आहे. अनेक रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाहूया राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध जिल्ह्यांच्या वाट्याला कोणते प्रकल्प आले आहेत. नदीजोड प्रकल्पाबाबतही मोठ्या घोषणा झाल्या.

Maharashtra Budget 2023 Live: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी 9 मार्च 2023 रोजी वर्ष 2023-24 साठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे वार्षिक 6000 रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांच्या आणि नागरिकासाठीच्या मूलभूत पाणी प्रश्नावरही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. राज्यामध्ये अनेक नदीजोड प्रकल्प सुरू आहेत. तसेच जलसिंचन प्रकल्प आणि रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत अनेक घोषणा झाल्या.

राज्यामध्ये शेतीसाठी होणाऱ्या जलसिंचनाचा असमतोल तयार झाला आहे. (Maharashtra irrigation project) तो कमी करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने या बजेटमध्ये केल्याचे दिसून येत आहे. अनेक रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाहूया राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध जिल्ह्यांच्या वाट्याला कोणते प्रकल्प आले आहेत.

नदीजोड प्रकल्पाबाबतच्या घोषणा (river connection project Maharashtra)

www.agrowon.com

 1. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करण्यात येणार.
 2. नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरण्यात येणार. 
 3. मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला याचा लाभ होणार. 
 4. वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना मिळणार. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच गावांना हे पाणी मिळणार.

तापी महापुनर्भरण प्रकल्प (Tapi Project Maharashtra budget)

 1. पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प.
 2. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ मिळणार. या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार (Maharashtra irrigation project)

 1. गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकी मान्यता दिली. 
 2. चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार. 
 3. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार असल्याची घोषणा केली. 
 4. बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार
 5. गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार. 
 6. कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधार्‍यांच्या कामांना गती देण्यासाठी निधीची तरतूद.

मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले( Marathwada water grid)

www.citykatta.com

 1. मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.
 2. छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी मिळणार.
 3. बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी मिळणार.
 4. धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी मिळणार.

हर घर जल: जलजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद (Jal Jeevan Mission)

 1. जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये खर्च करणार.
 2. 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प उभारणार.
 3. 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी 
 4. 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया करणार.
 5. 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने देणार.
 6. ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0 (JalYukt Shivar scheme 2.0)

www.tatatrusts.org

 1. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये राबवणार.
 2. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ मिळणार.