महाराष्ट्र सरकारच्या कौश्यल विकास, रोजगार उद्योजकता विभागाकडून स्वयंरोजगार आणि उद्योग निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या विभागाने स्टार्टअप(startup) धोरण जाहीर करण्यात आले होते. त्याअंतर्गत स्टार्टअप संदर्भात विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उद्योजकता विभागाने महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज (maharashtra student innovation challenge) ही स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मूदत वाढ देण्यात आली आहे. या उपक्रमातंर्गत उत्कृष्ट उद्योग संकल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 लाखांपर्यतचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. नेमके या उपक्रमाचे स्वरूप काय आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज
राज्यातील महाविद्याल्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप विषयक ज्या नवनवीन संकल्पना आहेत. त्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य उद्योजगता विकास मंडळाकडून महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी करून घेण्यात आले आहे. या स्पर्धेत सुरुवातीला जिल्हास्तरातून विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची निवड करण्यात येणार आहे. त्यातून राज्यस्तरावरील सर्वोत्तम प्रकल्प सादरीकरण करणाऱ्या नव उद्योजक विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इतर सर्वोत्कष्ट नवउद्योग संकल्पनासाठी बीज भांडवल
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी आणि संस्थांमधून तालुकास्तरावर 3 उत्तम विजेत्यांची निवड करून त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच जिल्हास्तरावर 10 सर्वोत्कृष्ट विजेत्यांना 1 लाख रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचबरोबर या चॅलेज स्पर्धेत राज्यस्तरावर सर्वोत्तम उद्योगाचे सादरी करणाऱ्या एकूण 10 नव उद्योजकांना 5-5 लाखांचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या स्पर्धेची अधिकची माहिती www.schemes.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.