Lowest Loan rate: गृहकर्ज घेण्यासाठी अनेकजण सर्वात कमी व्याजदर कोणती बँक देतेय हे शोधत असतात. तसेच वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. वाढत्या गरजा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बाजारातील वस्तुंची मागणीही वाढली आहे. नोकरदार वर्गाकडून या तिन्ही गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी अर्ज येतात.
गृहकर्ज स्वस्तात कुठे मिळेल?
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 8.40% दराने गृहकर्ज मिळू शकते. तर एचडीएफसी लिमिटेड, बँक ऑफ इंडिया आणि सेस्ट बँक ऑफ इंडियात अनुक्रमे 8.50%, 8.65% आणि 8.70% व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते.
वाहनकर्ज स्वस्तात कुठे मिळेल?
अॅक्सिस बँक ऑफ इंडियामध्ये 8.55% व्याजदराने वाहनकर्ज मिळेल. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, IDBI बँकमध्ये अनुक्रमे 8.65%, 8.70%, 8.75% दराने वाहन कर्ज मिळेल.
वैयक्तिक कर्ज स्वस्तात कुठे मिळेल?
जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक कमी दराने व्याज मिळेल. BOM मध्ये 10% व्याजदराने पर्सनल लोन मिळेल. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेत 10.40% व्याजदराने कर्ज मिळेल. तसेच अॅक्सिस बँक, IDFC first bank, इंडसंड बँकेत 10.49% दराने वैयक्तिक कर्ज मिळेल.
टीप - वर नमूद केलेले व्याजदर हे पात्र ग्राहकांनाच लागू होतील. बँकेच्या नियम, अटीत न बसणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजदर लागू होऊ शकतो. कर्जाची रक्कम, कर्जदाराचे उत्पन्न, ठिकाण, क्रेडिट स्कोअर, बँकेशी असणारे संबंध इ घटकांवर व्याजदर अवलंबून असतो. वरील व्याजदर हे मे महिन्यातील आहेत. त्यामध्ये बदल होऊ शकतो.
मुदत ठेवींवर (FD) सर्वाधिक व्याजदर कुठे मिळू शकतो?
टीप - वर नमूद केलेले मुदत ठेवींचे दर हे 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या गुंतवणूकीवर लागू आहेत. यातील काही बँका आणि वित्तसंस्थांचे व्याजदर हे 1 कोटींपेक्षा कमी ठेवींवर लागू आहेत. तसेच ठेवीदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे. BankBazaar.com वरुन मे महिन्यातील व्याजदराची आकडेवारी घेतील आहे. यामध्ये बदल होऊ शकतो.