Lowest Loan Rate: गृहकर्जाचे व्याजदर वाढले असले तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. घरांची मागणी तेजीत आहे तसे कारची मागणीही जास्त आहे. सर्वात कमी व्याजदर कोठे मिळेल याच्या शोधात ग्राहक असतात. व्याजदर कमी म्हणजे EMI सुद्धा कमी द्यावा लागेल. या लेखात पाहूया सर्वाधिक कमी गृह आणि वाहन कर्ज कोठे मिळेल?
परवडणाऱ्या दरात गृहकर्ज देणाऱ्या बँका
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक सर्वाधिक कमी म्हणजे 8.40% दराने ग्राहकांना गृहकर्ज देत आहे. त्याखालोखाल युको बँक 8.45% आणि बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया 8.50% दराने गृहकर्ज देत आहे. त्यानंतर IDBI बँक 8.55% आणि बँक ऑफ महाराष्ट्र, HSBC 8.60% दराने गृहकर्ज देत आहे.
पात्र ग्राहकांचा ऑफर लागू
व्याजदराची आकडेवारी ही बँकबझार संकेतस्थळावरुन घेतलेली आहे. सर्वात कमी व्याजदर पात्र कर्जदारांनाच मिळतो. सिबिल स्कोअर, कर्जाची रक्कम, व्यवसाय, ठिकाण, पूर्वीचे कर्ज यासह विविध गोष्टींवर व्याजदर किती लागू होईल हे ठरते. यापेक्षा जास्त व्याजदरही ग्राहकांना लागू होवू शकतो.
स्वस्त कार लोन देणाऱ्या बँका
इंडियन बँक सर्वाधिक कमी 8.65% दराने कार लोन देत आहे. त्यानंतर युको बँक 8.70% दराने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक 8.75% दराने कार लोन देत आहे. IDBI बँक आणि कॅनरा बँक 8.80% दराने कार लोन देत आहे. पात्र ग्राहकांनाच सर्वाधिक कमी व्याजदर लागू होतो. जुलै अखेरपर्यंतचा व्याजदर देण्यात आला आहे.