Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Upcoming Sale 2023 : सप्टेंबर महिन्यात फ्लिपकार्टचे 4 धमाकेदार सेल; ग्राहकांना मिळेल 80 % पर्यंत सूट

Flipkart Upcoming Sale 2023 : सप्टेंबर महिन्यात फ्लिपकार्टचे 4 धमाकेदार सेल; ग्राहकांना मिळेल 80 % पर्यंत सूट

Image Source : www.cashify.in

फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध होत्या. तुम्ही या सेलमध्ये खरेदीचा लाभ घेतला नसेल तर काळजी करू नका. आता फ्लिपकार्टवर आणखी काही सेल येत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, कपडे, यासह इतर अनेक उत्पादनांवर जवळपास 40% पासून 80% पर्यंतची सूट मिळू शकते.

ऑनलाईन इ कॉमर्स वेबसाईट्सवर ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्समध्ये वस्तू खेरदी करण्याची संधी उपलब्ध होते. त्याच प्रमाणे फ्लिपकार्ट (FlipKart) कडूनदेखील सातत्याने धमाकेदार ऑफरचे सेल सुरू केले जातात. आता येणाऱ्या काही दिवसांत सण उत्सावांचा सीझन आहे. त्यातच फ्लिपकार्टचे सप्टेंबर महिन्यात तब्बल 4 ऑनलाईन शॉपिंगचे सेल येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी  उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टचे कोणकोणते सेल आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊ..

फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध होत्या. तुम्ही या सेलमध्ये खरेदीचा लाभ घेतला नसेल तर काळजी करू नका. आता फ्लिपकार्टवर आणखी काही सेल येत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, कपडे, यासह इतर अनेक उत्पादनांवर जवळपास 40% पासून 80% पर्यंतची सूट मिळू शकते. ज्यामुळे तुमचा येणारा फेस्टिव्हल कालावधी फ्लिमकार्टवरील खरेदीसह अधिक आनंदात जाईल. फ्लिमकार्टवर सध्या ग्रँड फेस्टिवल सेल सुरु असून सप्टेबर महिन्यात आणखी 4 धमाकेदार सेल सुरू होण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्ट सुपर सेव्हर डे सेल-

फ्लिप कार्ट या इकॉमर्स कंपनीकडून संप्टेबरमध्ये सुपर सेव्हर डे सेल (Super Saver Days Sale) सुरू होणार आहे. साधारणत: 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत हा सेल ग्राहकांसाठी उपलब्ध असेल . यामध्ये तुम्हाला सौधर्य प्रसाधने, पर्सनल केअर, कपडे यासह इतर दैनदिन वापराच्या वस्तूंवर  80% पर्यंत सूट मिळू शकते.

स्मार्टफोन कार्निव्हल सेल-

ऑनलाईन खरेदी आणि सेल म्हटले की प्रत्येकाच्या नजरा या मोबाईल फोन्सच्या किमतीवर मिळणाऱ्या ऑफर्सकडे लागलेल्या असतात. अनेकजण मोबाईल खरेदीसाठी फ्लिमकार्टसारख्या इतंर कंपनीच्या ऑफर्स देणाऱ्या सेलची वाट पाहात असतात. तुम्ही देखील अशा सेलची वाट पाहात असाल तर तुम्हाला फार काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही.  फ्लिमकार्टचा Smartphone Carnival Sale सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे 2 सप्टेबर ते 8 सप्टेंबर या कालवधीत सुरू होण्याची शक्यता आहे. या सेलमध्ये तुम्हाला 40 टक्के  पर्यंत सवलतीच्या दरात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ग्रँड होम अप्लायंसेस सेल

फ्लिमकार्टचा Grand Home Appliances Sale 7 सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे. या सेल मध्ये तुम्हाला टीव्ही, फ्रिज, एसी, ओव्हेन, यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकराणांची स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. यामध्ये तुम्हाला 70% पर्यंतच्या ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे.

ग्रँड गॅझेट सेल -

फ्लिपकार्टच्या  ग्रँड गॅझेट सेलची (Grand Gadget Days Sale) देखील अनेकजण वाट पाहात असतात. यासेल मध्ये तुम्ही टॅब्लेट, कॅमेरा, लॅपटॉप, हेडफोन, स्पीकर आणि बरेच काही यासारखे काही अप्रतिम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मोठ्या सवलतींसह मिळवू शकता. HP, Apple MacBook, Philips, Sony, Nikon, Canon आणि इतरांसह सर्वोत्कृष्ट ब्रँड्स येथे उत्तम ऑफर्समध्ये उपलब् होतात. हा सेल 7 सप्टेंबर पासून 11 सप्टेबर या कालावधीत सुरु होण्याची शक्यता आहे.


या आगामी सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू स्वस्तात खरेदी करू शकणार आहात. मात्र, अशा प्रकारच्या सेलमध्ये देणाऱ्या ऑफर्स, डिल्सची संपूर्ण माहिती घेऊनच खरेदीला प्राधान्य द्या. प्रत्येक कंपनीच्या ऑफर्सचे नियम वेगवेगळे असू शकतात. त्याची पूर्ण माहिती घेऊनच खरेदीचा निर्णय घ्या.