Recurring Deposit: ज्या गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी बऱ्याच सरकारी गुंतवणूक योजना आहेत. त्यात बँकेच्या मुदत ठेवी आणि आवर्ती ठेव (Fixed Deposit & Recurring Deposit) योजनेचाही सहभाग होतो. तर आज आपण गुंतवणुकीच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आरडी या योजनेबाबात जाणून घेणार आहोत.
म्युच्युअल फंडमध्ये जे लोक एसआयपीच्या (Systematic Investment Plan-SIP) माध्यमातून गुंतवणूक करतात. अगदी त्याचपद्धतीने रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला पैसे भरता येतात. फक्त यामध्ये म्युच्युअल फंडप्रमाणे युनिट्स मिळत नाहीत. तर तुमचे पैसे त्या दिवशी खात्यात जमा होतात आणि त्यावर ठरल्याप्रमाणे कालावधी संपल्यावर व्याज मिळते. सध्या बऱ्याच बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली. त्याचबरोबर काही बँकानी आवर्ती ठेव योजनांमध्येही (आरडी स्कीम) वाढ केली. किमान गुंतवणुकीपासून आरडीमध्ये 2.50 ते 8.50 टक्के यादरम्यान व्याजदर दिला जात आहे.
मुदत ठेव आणि आवर्ती ठेव योजनांवर दिल्या जाणाऱ्या व्याजामध्ये तसा खूप फरक नाही. पण आवर्ती ठेव (आरडी) योजनेमध्ये तुम्हाला एकदम पैसे भरावे लागत नाही आणि यावर मिळणारे व्याज हे दर महिन्यांनी मिळते, ते ही चक्रवाढपद्धतीने. याचा कालावधी किमान 6 महिने ते कमाल 10 वर्षापर्यंत असतो.
7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणाऱ्या बँका
सध्या 7 टक्क्यापेक्षा जास्त व्याज देणाऱ्या काही मोजक्या बँका आहेत. त्यामुध्ये IDFC First Bank ही सर्वसाधारण ग्राहकांना 6.75 ते 7.25 टक्के यादरम्यान आरडीवर व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 ते 7.25 टक्के इतके व्याज ऑफर करते.
आयडीबीआय बँक सर्वसाधारण ग्राहकांना 7 ते 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 ते 7.65 टक्के व्याज देते.
येस बँक नियमित ग्राहकांना 5 ते 6.50 टक्के तर सिनिअर सिटिझन्सना 5.50 ते 7.25 टक्के यादरम्यान आरडीवर व्याज देत आहे.
8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणाऱ्या बँका
याशिवाय ज्या काही स्मॉल फायनान्स बँका आहेत. त्या आरडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. जन स्मॉल फायनान्स बँक (Jan Small Finance Bank) 2 ते 3 वर्षांच्या आरडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.55 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 1 ते 2 वर्षे आणि 2 ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी अनुक्रमे 8.45 आणि 8.50 टक्के व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) एका वर्षाच्या आरडीवर सर्वाधिक असे 8.45 टक्के व्याज देत आहे. तर 1 दिवस ते 559 दिवसांसाठी 8.20 टक्के व्याज ऑफर करत आहे. त्याचप्रमाणे एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) ही 2 वर्षे आणि 3 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.75 टक्के तर याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याजदर देत आहे.