All In One Policy : आत्तापर्यंत जीवन, आरोग्य आणि मोटर विम्यासह इतर विमा उत्पादनांचे फायदे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी घ्याव्या लागत होत्या. पण, येत्या काही दिवसात IRDAIकडून 'ऑल इन वन पॉलिसी' आणण्यावर काम सुरू आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश असेल आणि ग्राहकांना वेगळी पॉलिसी घ्यावी लागणार नाही. विमा नियामकाची ही योजना यशस्वी झाल्यास देशभरातील कुटुंबांना लवकरच ‘ऑल इन वन पॉलिसीचा’ लाभ घेता येऊ शकतो. आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले की, हे काम निश्चितच अवघड आहे, पण यासाठी प्रयत्न सुरू आहे.
विमा ट्रिनिटी म्हणजे काय?
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)ने देशातील विमा उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. IRDAIचे ‘विमा ट्रिनिटी,’ एक परवडणारे उत्पादन आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य, जीवन, मालमत्ता आणि अपघात कव्हरेज देणे आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, देश विमा उत्पादनांचा वेगाने विस्तार करण्यासाठी अशा योजनेवर काम करत आहे. ऑल इन वन विमा पॉलिसी एकाधिक जोखीम संरक्षण एकत्र आणेल आणि क्लेम एका सामान्य उद्योग मंचाशी जोडून सेटलमेंट प्रक्रिया सोपी करून देण्यात येईल.
आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले की…
आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले, की ग्राहकांच्या सर्व जोखमी एका पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जाव्यात, तसेच ही पॉलिसी सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय या पॉलिसीचा प्रीमियम कमी असायला हवा आणि क्लेम सेटलमेंटही लवकर व्हायला हवे. ते म्हणाले की, जर आमची योजना आकाराला आली तर देशभरातील कुटुंबांना लवकरच अशा स्वस्त सिंगल पॉलिसीची भेट मिळेल, ज्यामध्ये आरोग्य, जीवन, मालमत्ता आणि अपघात कव्हरेज याबाबत सुरक्षा दिली जाईल. या पॉलिसीद्वारे क्लेम सेटलमेंट काही तासांत होईल.
सर्वसामान्यांना वेगवेगळ्या गरजांसाठी विमा पॉलिसीसाठी शोधाशोध करावी लागू नये, अशी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची इच्छा आहे. एकाच वेळी, त्याने अशी पॉलिसी घ्यावी, ज्यामध्ये आरोग्य, जीवन आणि मालमत्तेसह सर्व क्षेत्रांशी संबंधित जोखीम समाविष्ट असतील आणि सर्व पॉलिसींचा प्रीमियम एकरकमी भरावा.
Source : hindi.news18.com