Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC’s Dhanvarsha Policy : एलआयसीची धनवर्षा पॉलिसी बंद होणार

LIC’s Dhanvarsha Policy

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची आपण निवड करतो. यामधीलच एक पर्याय म्हणजे एलआयसीच्या पॉलिसी. एलआयसीने (LIC) काही वर्षांपूर्वी सुरु केलेली एक पॉलिसी लवकरच बंद होत आहे. ती कोणती? ते पाहूया.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC - Life Insurance Corporation of India) ने आपल्या काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसेंबर तिमाहीच्या निकालासह, धनवर्षा योजनेबद्दल माहिती दिली. एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की एलआयसीची धनवर्षा स्कीम बंद करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, धन वर्षा योजना ही एक गैर-सहभागी, वैयक्तिक, बचत, एकल प्रीमियम जीवन विमा पॉलिसी आहे, जी ग्राहकांना संरक्षण तसेच बचत ऑफर करते.

धनवर्षा पॉलिसी कधीपासून बंद होणार?

एलआयसीचे अध्यक्ष म्हणाले की, 31 मार्चपासून धनवर्षा योजना बंद करणार आहेत. धनवर्षा पॉलिसी 866 अंतर्गत, मॅच्युरिटीवर बंपर रिटर्नसह, आणखी बरेच फायदे उपलब्ध आहेत. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, त्या परिस्थितीतूनही कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

योजनेची वयोमर्यादा

जर तुम्ही धनवर्षा योजनेअंतर्गत 15 वर्षांची मुदत निवडली असेल, तर विमा खरेदी करण्यासाठी किमान वयोमर्यादा 3 वर्षे आणि कमाल 60 वर्षे आहे. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये, किमान वयोमर्यादा 8 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे. एलआयसीच्या धन वर्षा पॉलिसीमध्ये ग्राहकांना कर्ज आणि सरेंडरची सुविधाही मिळते. धनवर्षा पॉलिसीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही licindia.in/ वेबसाइटला भेट देऊ शकता.

पॉलिसीवर दोन पर्याय उपलब्ध 

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या या योजनेअंतर्गत, सिंगल प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत. तुम्ही पहिला पर्याय निवडल्यास, तुम्हाला गॅरंटीड अॅडिशन बोनससह प्रीमियमच्या 1.25 पट डेथ बेनिफिट मिळेल, तर दुसरा पर्याय निवडल्यास, कुटुंबाला गॅरन्टेड अतिरिक्त बोनससह 10 पट डेथ बेनिफिट मिळेल. या योजनेअंतर्गत गॅरेन्टेड दिलेला बोनस निवडलेला पर्याय आणि मुदत या दोन्हीच्या आधारावर दिला जाईल.