Table of contents [Show]
76 औषध कंपन्यांची तपासणी
ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियानं 20 राज्यांतल्या जवळपास 76 औषध कंपन्यांची तपासणी केली. केंद्र आणि संबंधित राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. मात्र या सर्व कंपन्यांविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. औषध नियामक विभागानं विविध राज्यांतल्या औषध निर्माता फर्म्सची माहिती मिळवलीय. यातल्या बहुतांशी कंपन्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातल्या असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भारतातून जी औषधे परदेशात विकली जात आहेत, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. गुणवत्ता हाच निषक वादाचा राहिलाय. त्यात आता देशांतर्गत औषध गुणवत्तेचा प्रश्नही यानिमित्तानं समोर आलाय.
परत मागवावी लागली होती औषधं
बनावट औषध बाजारात पाठवून औषध कंपन्या रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत, तर दुसरीकडे नफाही मिळवत आहेत. संबंधित विभागानं तपासणी केल्यानंतर ही बाब उघड झालीय. या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेनं नोएडातल्या औषध कंपनीला इशारा दिला होता. मेरियन बायोटेक या कंपनीनं उत्पादित केलेल्या खोकल्याच्या औषधाचा आणि उझबेकिस्तानमधल्या 18 मुलांच्या मृत्यूचा संबंध जोडून हा इशारा देण्यात आला होता. दुसरीकडे, चेन्नईतल्या ग्लोबल फार्मा हेल्थकेअरद्वारे विकलं जाणारं आय-ड्रॉप आरोग्यास योग्य नसल्याचं समोर आलं होतं. युनायटेड स्टेट्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चेन्नईतल्या या फार्मा हेल्थकेअरला इशाराही दिला होता. या आय-ड्रॉपमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि दृष्टी कमी झाल्याची अनेक प्रकरणे होती, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर कंपनीला त्यांनी तयार केलेल्या आय ड्रॉप्सची संपूर्ण बॅच परत मागवावी लागली होती.
सुमार गुणवत्ता
हरयाणा राज्यातली एक बनावट औषधाचं प्रकरण समोर आलं होतं. इथल्या मेडेन फार्मास्युटिकल्समध्ये तयार झालेलं खोकला आणि सर्दीचं औषध निकृष्ट असल्याचं स्पष्ट झालं होतं. याचा वापर केल्यानं गॅम्बियामध्ये 60 मुलांचा कथित स्वरुपात मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. एनडीटीव्हीच्या (NDTV) अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये गुजरातमधल्या झायडस लाइफसायन्सेसला अमेरिकेत पाठवलेल्या 55,000 जेनेरिक औषधांच्या बाटल्या परत मागवाव्या लागल्या होत्या. सुमार गुणवत्ता हाच निकष याठिकाणीही लावण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता
कमी दर्जाची किंवा बनावट औषधं फक्त देशांतर्गत, स्थानिक रुग्णांसाठीच धोक्याची नाहीत, तर इतर देशांमध्ये अशी औषधं निर्यात होत असल्यास त्याचा आंतरराष्ट्रीय परिणाम विपरित होतो. अशाप्रकारची बनावट औषधे मानक दर्जा मिळवण्यात अपयशी ठरतात. दुसर्या औषधाशी संबंधित असलेल्या नावाखाली उत्पादित केलेले औषध हे फसव्या रीतीने इतर औषधांसारखंच. गुणवत्तेचं मानक पूर्ण केलेलं नसतं. खरं तर भारतात निर्माण झालेल्या औषधांची मागणी वाढत आहे. मात्र यासंबंधीते निकष पूर्ण करण्यात त्या अपयशी ठरत आहेत.या बनावट औषधांमुळे जागतिक औषध बाजारपेठेतली भारताची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता आहे. 2019च्या एका अहवालानुसार, नॅशनल गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस प्रोग्राम या अंतर्गत, भारतात फक्त 47 औषध चाचणी सुविधा होत्या आणि फक्त सहा केंद्रीय प्रयोगशाळा होत्या, दरवर्षी फक्त 8,000 नमुन्यांची चाचणी होते.