Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Share's : Adani समूहातील शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ; LIC'ला तोटा भरून काढण्याची संधी

LIC Share's Growth

Image Source : www.thehindubusinessline.com

LIC Growth : अदानी समूहाची गुंतवणुक असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स (Adani Ports) अँड SEZ लिमिटेडमध्ये शेअरहोल्डिंग 9.14 टक्क्यांपर्यंत आहे सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) अदानी समूहाच्या शेअर गुंतवणुकीतील तोटा भरून काढला आहे. अदानी समूहाचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहेत.

अदानी समूहाची गुंतवणुक असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स अँड SEZ लिमिटेडमध्ये शेअरहोल्डिंग 9.14 टक्क्यांपर्यंत आहे सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) अदानी समूहाच्या शेअर गुंतवणुकीतील तोटा भरून काढला आहे.  अदानी समूहाचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहेत.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर मोठी घसरण (Great decline after the Hindenburg report)

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर यूएस शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी एक खळबळजनक अहवाल सादर केल्यामुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आठवडाभरापूर्वी शेअर बाजारात एलआयसी मधून अनेक गुंतवणुकदारांनी काढता पाय घेतला होता.  30,127 कोटी रुपयांच्या खरेदी किमतीचे अदानी समूहातील LIC च्या शेअर्सचे मूल्य 24 फेब्रुवारी रोजी 29,893.13 कोटी रुपयांवर घसरले आहेत.

LIC'ने केलेली गुंतवणुक (Investment by LIC)  

पण गुंतवणूकदारांनी अदानी समूहावर विश्वास दाखवल्यामुळे शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे परिस्थिती उलट झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे अदानी एंटरप्रायझेचा 4.23 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.28 टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाच्या सिमेंट कंपन्यांमध्येही एलआयसीचे शेअर होल्डींग आहे. LIC चा अंबुजा सिमेंट मध्ये 6.33 टक्के आणि ACC मध्ये 6.41 टक्के हिस्सा आहे. अदानी पोर्ट्समध्ये LIC ची 9.14 टक्के हिस्सेदारी आहे.

अदानी समूहाच्या  घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. 30 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात, एलआयसीने म्हटलेआहे की 31 डिसेंबर 2022 पर्यंत अदानी समूहाच्याकंपन्यांच्या अंतर्गत इक्विटी आणि कर्जाअंतर्गत त्यांचीएकूण होल्डिंग 35,917.31 कोटी रुपये होती. 2023 हे56,142 कोटी रुपये होते, कालांतराने त्याच्यागुंतवणुकीपेक्षा जास्त, गुंतवणूक फायदेशीर बनली