Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Share डिस्काउंट दरात लिस्ट; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम विकावा की होल्ड करावा?

LIC Share डिस्काउंट दरात लिस्ट; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम विकावा की होल्ड करावा?

एलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे शेअर्स मंगळवारी दि. 17 मे रोजी शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध झाले. 902 ते 949 अशी बॅण्ड प्राईस असणाऱ्या एलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.

दरम्यान, किरकोळ गुंतवणूकधारक, पॉलिसीधारक आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना जी सवलत मिळाली ती अँकर (Anchor Investors) आणि इतर श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी आहे; तितकी मोठी नाही. कारण एलआयसीने एलआयसी पॉलिसीधारकांसाठी प्रति इक्विटी शेअरमागे 60 रूपयांची सवलत जाहीर केली होती, तर एलआयसी कर्मचारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी प्रति शेअर 45 रूपयांची सूट दिली होती.

एलआयसी देशातील पाचवी मोठी कंपनी

एलआयसी (LIC) ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरली. शेअर मार्केटमधील भांडवली मुल्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल सर्वाधिक आहे. या चार कंपन्यांनंतर एलआयसी शेअर मार्केटमधील भांडवली मूल्यानुसार पाचवी कंपनी ठरली.  

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, नफा मिळवण्यासाठी खरेदी केलेल्या गुंतवणूकदार 800 रूपयांचा स्टॉप लॉस (Stop Loss) लावून शेअर्स होल्ड करू शकतात. तर नवीन गुंतवणूकदार प्रति शेअर 735 रूपयांच्या किमतीने खरेदी करू शकतात.

केवळ दुय्यम बाजारातील नकारात्मक भावनांमुळे एलआयसीचे शेअर्स सवलतीच्या दरात उघडले आहेत. दीर्घकालीन दृष्टिकोन असलेले गुंतवणूकदार सूचीबद्ध झालेल्या किमतीच्या 5 टक्‍क्‍यांच्या घसरणीवर एक संधी म्हणून शेअर्स खरेदी करू शकतात. तर नवीन गुंतवणूकदार ₹730 च्या वर जाईपर्यंत एलआयसीचे शेअर्स कॅलिब्रेटेड पद्धतीने खरेदी करू शकतात, असं मत आयआयएफएल सिक्युरिटीजचे (IIFL Securities) उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी नमूद केलं आहे.

एलआयसी कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम असून सध्या बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम एलआयसीच्या शेअर्सवर झाल्याचे फंड्स इंडियाचे (FundsIndia) सीईओ गिरीराजन मुरूगन यांनी म्हटले.