Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Saral Pension Plan: जाणून घ्या, एलआयसीच्या सरल पेंशन योजनेचे स्वरुप आणि फायदे

LIC Saral Pension Plan: जाणून घ्या, एलआयसीच्या सरल पेंशन योजनेचे स्वरुप आणि फायदे

एलआयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक दारास वर्षातून एकदाच प्रिमियम भरून ही योजना सुरू करता येते. तुम्ही विमा पॉलिसी सोबत एकदाच सरल पेंशन योजनेचा प्रिमियम भरावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकास त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेंशन मिळायला सुरुवात होते. तुम्हाला ही पेंशन महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक अशा स्वरुपात देखील प्राप्त करता येते

जनतेच्या आर्थिक साक्षर होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश नागरिक आता आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम गुंतवून निवृत्तीनंतरचेही प्लॅनिंगही करत आहेत. मार्केटमध्ये सध्या निवृत्तीनंतरही तुम्हाला चांगला आर्थिक परतावा देणाऱ्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीने (LIC) देखील सरल पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांबाबत चिंतामुक्त राहू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊयात सरल पेंशन योजनेचे फायदे आणि त्याचे स्वरुप या बद्दलची माहिती.

एलआयसीची  सरल पेंशन योजना

LIC ही एक सार्वजनिक सेवा क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील या कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. त्याच प्रमाणे एलआयसीने (LIC) नागरिकांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरल पेंशन योजना (Saral pension plan) सुरू केली आहे. मार्केटमध्ये निवित्तीनंतरच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणाऱ्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच एलआयसीची सरल पेंशन योजना ही एक विश्वासहार्य आणि फायद्याची पेशन योजना आहे.

काय आहे योजनेचे स्वरुप

एलआयसीच्या सरल पेशन योजनेमध्ये गुंतवणूक दारास वर्षातून एकदाच प्रिमियम भरून ही योजना सुरू करता येते. तुम्हाला जीवन विमा पॉलिसी सोबत एकदाच सरल पेंशन योजनेचा प्रिमियम भरावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकास त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेंशन मिळायला सुरुवात होते. तुम्हाला ही पेंशन महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक अशा स्वरुपात देखील प्राप्त करता येते. या पेंशन योजनेत तुम्हाला किमान वार्षिक 12000 म्हणजे महिन्याला हजार रुपये पेंशन मिळू शकते. तर जास्तीत जास्त पेंशन मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जास्तीत जास्त पेंशन ही तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून आहे. तुम्ही वयाच्या 40 पासून या योजनेमध्ये गुंतवणूक करून पेंशन सुरू करू शकता.

10 लाख प्रिमियमला किती मिळेल पेंशन?

एलआयसीच्या अधिकृत संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी सरल पेंशन योजनेमध्ये 10 लाखांचा प्रमियम भरला. तर तुम्हाला सिंगल अॅन्युइटीमध्ये वार्षिक 58950 रुपये पेंशन मिळेल. तसेच तुम्हाला संयुक्त अॅन्युइटीनुसार वार्षिक 58,250 रुपये पेंशन मिळत राहिल. तुम्ही ही पेंशन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. एवढेच नाही, तर समजा तुम्हाला ही पेंशन पॉलिसी योग्य वाटली नाही तर तुम्ही एक महिन्याच्या आत ही रद्द करू शकता

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

यामध्ये सिंगल लाईप अॅन्युइटी प्लॅन आणि संयुक्त लाईफ अॅन्युइटी असे दोन प्लॅन आहेत. सिंगल लाईफ अॅन्युइटी प्लॅनमध्ये पॉलिसी धारकांच्या मृत्यू पर्यंत पेंशन मिळत राहते. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर गुंतवणनूक केलेली रक्कम वारसदारास मिळते. तर संयुक्त लाईफ अॅन्युइटी या प्लॅनमध्ये पती पत्नी दोघांना कव्हरेज देण्यात आलेले असते. यामध्ये प्रायमरी पॉलिसी धारकाच्या मृत्यू पर्यंत त्याला पेंशन दिली जाते. त्याच्या मृत्यूनंतर सह पॉलिसीधारकास पेंशन मिळण्यास सुरुवात होते. तसेच जीवन विमा पॉलिसीची रक्कम पॉलिसी धारकाच्या निधनानंतर विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते.