• 02 Oct, 2022 07:51

LIC Market Cap Fall: टॉप 10 'मार्केट-कॅप'मधून एलआयसी बाहेर, पुढे काय होणार

LIC M-cap Fall

LIC Market Cap Fall: शेअर मार्केटमध्ये प्रवेश केल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. शेअर होल्डर्सचे नुकसान झालेच पण एलआयसीला देखील मोठा फटका बसला आहे. शेअरच्या सुमार कामगिरीने LIC च्या बाजार भांडवलात (Market Capitalization) प्रचंड घसरण झाली.

देशातील सर्वात मोठ्या 'IPO'चा विक्रम करुन हिरो बनलेली एलआयसी  शेअर मार्केटमध्ये मात्र झिरो बनली आहे. शेअर बाजारातील भांडवलाच्या दृष्टीने सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या क्रमवारीत एलआयसी टॉप-10 मधून बाहेर पडली आहे.आज 1 सप्टेंबर 2022 रोजी एलआयसीची मार्केट कॅप 4,23,079.25 कोटी इतकी खाली घसरली आहे. एलआयसी आता 11 व्या स्थानावर आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात प्रवेश केला होता. एलआयसीची नोंदणी निराशाजनक झाली होती. पहिल्या दिवशी एलआयसीचे बाजार भांडवल 5.48 लाख कोटी इतके होते. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या शेअरमध्ये सुरु झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. आतापर्यंत एलआयसीचा शेअर सरासरी 23% घसरला आहे. ज्यामुळे एलआयसीचे मार्केट कॅप 4.23 लाख कोटींपर्यंत खाली आली. बजाज फायनान्स आणि अदानी ट्रान्समिशन या दोन कंपन्यांनी मार्केट कॅपमध्ये एलआयसीचा पछाडले आहे.

एलआयसीच्या शेअरमधील घसरणीची मोठी झळ सर्वात मोठा हिस्सेदार असलेल्या केंद्र सरकारला बसली आहे. एलआयसीने IPO वेळी प्रती शेअर 949 रुपयांचा दर निश्चित केला होता. त्यातुलनेत मागील साडेतीन महिन्यात एलआयसीचा शेअर 30% कोसळला आहे. आज 1 सप्टेंबर 2022 रोजी एलआयसीचा शेअर बीएसईवर 668.90 रुपयांवर बंद झाला. त्यात 0.69% घसरण झाली. एनएसईवर एलआयसी 668.70 वर स्थिरावला. त्यात 0.71% घसरण झाली. एलआयसीचा शेअर आणखी किती घसरणार याबाबत शेअर बाजार विश्लेषकांमध्ये मतमतांतरे आहेत. एलआयसीच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत घसरण झाली होती. त्यामुळे एलआयसीबाबत दिर्घकाळ गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.

life-insurance-corporation-of-india-live-on-bse.png

बाजार भांडवलाचा विचार केला तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी 17.8 लाख कोटींच्या भांडवलासह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय,अदानी ट्रान्समिशन आणि बजाज फायनान्स या कंपन्या आहेत. गौतम अदानी यांच्या सातही कंपन्यांचे एकत्रित भांडवल 20.32 लाख कोटी इतके आहे. 

क्रमवारी

कंपनीचे नाव

बाजार भांडवल  Market Cap ( Trillion Rupees)

1

रिलायन्स इंडस्ट्रीज

17.32

2

 टीसीएस

11.46 

3

एचडीएफसी बँक  

8.19

4

इन्फोसिस  

6.14

5

एचयूएल

6.13

6

आयसीआयसीआय बँक

 6.09

7

एसबीआय

4.76

8

एचडीएफसी

4.37

9

बजाज फायनान्स

4.34

10

अदानी ट्रान्समिशन

 4.32