Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Shares Trade Ex-Dividend: गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय?

LIC Shares Trade Ex-Dividend: गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय?

LIC Share Price : एलआयसीच्या शेअरमध्ये आज शुक्रवारी 26ऑगस्ट 2022 रोजी तेजी दिसून आली. इंट्रा डे मध्ये एलआयसीचा शेअर 682.65 रुपयांवर जाऊन आला. एलआयसी आणि गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्वाचा होता.

आयपीओपासून गुंतवणूकदारांना रडकुंडीला आणणाऱ्या ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये आज शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी तेजी दिसून आली. गुरुवारी ‘एलआयसी’ शेअरचे Ex-Dividend वर ट्रेडिंग झाले. Ex-Dividend म्हणजे सर्वसाधारणपणे डिव्हीडंडसाठीचा रेकॉर्ड डेटपूर्वीचा एक दिवस असतो. ‘एलआयसी’ने डिव्हीडंडसाठी 26 ऑगस्ट 2022 ही रेकॉर्ड डेट घोषित केली होती. त्यामुळे आजपासून जे गुंतवणूकदार ‘एलआयसी’चा शेअर खरेदी करतील, त्यांना लाभांश मिळणार नाही.

'एलआयसी'ने आतापर्यंत गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान केले आहे. आज शुक्रवारी LIC चा शेअर 678.75 रुपये या पातळीवर  होता. त्यात 0.13% वाढ झाली. काल गुरुवारी देखील एलआयसीचा शेअर 6 रुपयांनी वाढला होता. शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून 'एलआयसी' शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे. 

lic-share.PNG

एलआयसीती वार्षिक सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. गेल्या महिन्यात एलआयसी बोर्डाने आर्थिक वर्ष 2022 साठी 1.5 रुपया प्रती शेअर लाभांश देण्याची घोषणा केली होती. (LIC announce Dividend) लाभांशसाठी पात्र होण्याकरिता 26 ऑगस्ट 2022 ही रेकॉर्ड डेट आहे. या तारखेपूर्वी ज्यांच्याजवळ ‘एलआयसी’चे शेअर असतील ते लाभांशसाठी पात्र ठरणार आहेत.  (Record date for finalizing eligible shareholders for the payout)

एलआयसीने मे 2022 मध्ये शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता. एलआयसीने शेअर विक्री करुन 21000 कोटींचे भांडवल उभारले होते. मात्र शेअरमध्ये पहिल्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. तेव्हापासून एलआयसीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली आहे. आजच्या घडीला एलआयसीचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत 20% घसरला आहे.