Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Childrens Money Back Plan: एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी बाबत जाणून घ्या सविस्तर

New Childrens Money Back Plan

LIC Policy: तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल, तर एलआयसीची न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी गुंतवणूक करण्यास एक उत्तम पर्याय आहे. याअंतर्गत 10 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तुमचे मुलं 18 वर्षाचे झाले की, या पॉलिसीचा उत्तम परतावा तुम्हाला मिळतो. या प्लॅनचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण तसेच इतर गरजा पूर्ण करु शकता.

New Childrens Money Back Plan Policy: आजच्या या स्पर्धेच्या युगात पालकांना अगदी लहान वयापासूनच मुलांच्या भविष्याची काळजी लागली राहाते. यासाठी तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने लहान मुलांसाठी प्लॅन केलेल्या एलआयसी बाबत माहिती असणे गरजेचे आहे. न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी मार्फत तुम्ही मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. यासोबतच इतर अनेक फायदेही मिळू शकतात.

या पॉलिसीचे नाव न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लॅन (LIC New Children's Money Back Plan) असे ठेवण्यात आले आहे, ज्याद्वारे तुम्ही 10,000 रुपये गुंतवून तुमच्या मुलांसाठी चांगली गुंतवणूक करू शकता. लोकांचा LIC वर खूप विश्वास आहे, कारण लोकांना आपल्या कष्टाचे पैसे अगदी सुरक्षित जागी गुंतवायचे असतात.

या पॉलिसीचे फायदे

LIC ची नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही 0 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये किमान 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, कमाल रकमेसाठी गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही पॉलिसी घेणाऱ्याला 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 20% परतावा मिळतो.

पॉलिसीचे वैशिष्ट्ये

0 ते 12 वयोगटातील मुलासाठी कोणतेही पालक ही पॉलिसी घेऊ शकतात.

अनपेक्षित घटनांच्या बाबतीत कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मुलासाठी लाइफ कव्हरचा या योजनेत समावेश आहे.

ही योजना मुलाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते.

मुलाच्या शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक अंतराने पैसे परत करण्याची सुविधा ही योजना देते.

तुम्ही भरलेला प्रीमियम आणि प्राप्त झालेल्या परिपक्वता रकमेसाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C आणि 10(10D) अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता.

कव्हरेजचा फायदा मिळतो

एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन ही एक जीवन विमा पॉलिसी आहे, जी मुलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही योजना जीवन विमा संरक्षण, नियमित उत्पन्न आणि विशिष्ट अंतराने पैसे परत यासारखे अनेक फायदे देते, जेणेकरून गुंतवणुकीची खात्री ग्राहकाला मिळेल आणि दुर्दैवी घटना घडल्यास मुलाच्या गरजा वेळेत पूर्ण केल्या जातात.

आवश्यक कागदपत्रे

पालकांचे आणि मुलाचे आधार तसेच पॅन कार्ड

अॅड्रेस प्रूफ फोटो कॉपी

मुलाचे वैद्यकीय कागदपत्रे