LIC Kanyadan Policy: आयुर्विमा कंपनीने मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी गुंतवणूक करण्यास LIC 'कन्यादान पॉलिसी योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करु शकते. ही योजना 25 वर्षांसाठी आहे. या योजने अंतर्गत लोकांना दररोज 121 रुपयांची बचत करुन, दरमहा 3600 रुपये प्रीमियम भरावा लागेल. परंतु पॉलिसी काढणाऱ्या व्यक्तीला केवळ 22 वर्षांसाठीच प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीची 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, गुंतवणूकदाराला 27 लाख रुपये मिळतात.
1 लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकतो
ही पॉलिसी घेण्यासाठी वडिलांचे वय कमीत कमी 18 ते 50 वर्षे आणि मुलीचे वय किमान 1 वर्षे असावे. ही योजना 25 वर्षांसाठी उपलब्ध असेल. एलआयसीच्या कन्यादान पॉलिसी योजना गुंतवणूकदाराच्या आणि त्याच्या मुलीच्या वेगवेगळ्या वयोगटानुसारही घेऊ शकतो. या LIC कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत, तुमच्या निवडलेल्या मुदतीपेक्षा फक्त 3 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल. तसेच गुंतवणूकदार यामधून किमान 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकतो.
केवळ तीन वर्ष गुंतवणुकीचा पर्याय
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये फक्त तीन वर्षांच्या प्रीमियमची गुंतवणूक करण्याचाही पर्याय निवडू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर परतावा मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांसाठी सुमारे 50,000 रुपये गुंतवावे लागतील. कन्यादान विमा योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 30 वर्षे असावे लागते. तीन वर्षे गुंतवणूक करण्याच्या योजनेत, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 30 वर्षे असावे, हा या योजनेचा सर्वात महत्वाचा नियम आहे. गुंतवणूक करणाऱ्याच्या मुलीचे वय किमान 1 वर्षे असावे.
1.50 लाख रुपयांची कर सूट मर्यादा
एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्याचे अनेक मार्ग आहेत. यामध्ये मॅच्युरिटी कालावधी कमीत कमी 13 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे आहे. यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे लागतात. गुंतवणूकदारांनी केलेल्या पेमेंटवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची कर सूट मर्यादा देण्यात आली आहे.