भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) जीवन आझाद (Jeevan Azad) नावाने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वैयक्तिक बचत आणि जीवन विमा हा आहे. LIC जीवन आझाद (Plan 868)योजना ग्राहकांना संरक्षण विमा आणि चांगल्या परताव्यासह गुंतवणुकीची संधी देत आहे.
LIC Jeevan Azad योजनेची वैशिष्ट्ये:
- LIC जीवन आझाद ही नॉन-पार्टिसिपेटेड, नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, बचत जीवन विमा असून मर्यादित प्रीमियम एंडोमेंट योजना आहे.
- यामध्ये मर्यादित प्रीमियम पेमेंट (Limited Premium Payment) पर्याय उपलब्ध आहे. यात प्रीमियम भरण्याची मुदत पॉलिसीच्या मुदतीपेक्षा 8 वर्षे कमी आहे.
- पॉलिसी मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते.
- अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणीत कर्ज घेण्याची सुविधा देखील यात मिळते.
- अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ या योजनेत उपलब्ध आहेत.
- ही नॉन-मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी असून यांत पॉलिसीधारकाला 3 लाखांपर्यंतची मदत मिळू शकते.
एलआयसी जीवन आझाद विम्यातील आर्थिक लाभ
या योजनेअंतर्गत किमान मूलभूत विम्याची रक्कम रु. 2 लाख इतकी आहे, तर कमाल विम्याची रक्कम 5 लाख रु. इतकी आहे. पॉलिसीची मुदत 15 ते 20 वर्षे इतकी आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी किमान प्रवेश वय 90 दिवस इतके आहे, तर कमाल प्रवेश वय 50 वर्षे इतके आहे. प्रीमियम नियमितपणे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक अंतराने भरला जाऊ शकतो. तसेच पॉलिसी 2 वर्षांनंतर सरेंडर देखील केली जाऊ शकते.तसेच प्रीमियमची पूर्ण 2 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उदाहरणार्थ, पॉलिसीधारकाला पहिल्या वर्षात वार्षिक रु. 25,120 रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर पुढील 12 वर्षांसाठी वार्षिक रु. 24,578 चा प्रीमियम भरावा लागेल. 12 वर्षात ग्राहक एकूण प्रीमियम रु. 2,95,478 भरेल. पॉलिसीचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकाला अंदाजे 5,000,000 इतकी रक्कम मिळेल.