भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC देशातील प्रत्येक नागरिकासाठी लाभदायक विमा पॉलिसी लाँच करत असते. यातील अनेक पॉलिसीज बहुतांश भारतीयांची प्रथम निवड ठरल्या आहेत. या पॉलीसिंप्रमाणेच LIC'ने जीवन अक्षय ही पॉलिसी आणली आहे. यात ठोक एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. खाजगी नोकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना बहुमूल्य ठरू शकते.
गुंतवणूकदार 30ते 85 वयोगटातील असणे आवश्यक
LIC जीवन अक्षय या पॉलीसीत गुंतवणूक केल्यास आयुष्यभर पेन्शन मिळेल, यासाठी तुमच्या गुंतवणूकीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल. यात गुंतवणूकदाराला जॉइन्ट अकाऊंट उघडता येत नाही. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 30 ते 85 दरम्यान असणे आवश्यक आहे.
गुंतवणूक जितकी जास्त तितकी मासिक पेन्शन जास्त
एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान एक लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. म्हणजे गुंतवणूक जितकी जास्त तितकी मासिक पेन्शन जास्त. पॉलिसीतील परताव्याच्या या निकषानुसार एक लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही 12,000 रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळवू शकता. दुसरीकडे, तुम्हाला दरमहा 20,000 रुपये आणि वार्षिक 2.40 लाख रुपये मिळवायचे असतील, तर त्यासाठी या पॉलिसीत 40 लाख 72 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. LIC'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या पॉलिसीविषयी अधिक माहिती जाणून घ्या
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या पॉलिसीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी जास्त रक्कम तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शन म्हणून मिळेल. जसे की 45 वर्षीय व्यक्तीने ही पॉलिसी विकत घेतली आणि 70,00,000 रुपयांच्या गुंतवणूकीचा पर्याय निवडला असेल, तर गुंतवणूकदाराला एकदाच 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. या गुंतवणुकीतून त्यांना दरमहा 36, 429 रुपये इतकी पेन्शन मिळेल.