Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Dhan Varsha Plan: नावाप्रमााणे पॉलिसीधारकांना मिळणार 10 पट अधिक रिटर्न्स, जाणून घ्या 'एलआयसी धनवर्षा प्लॅन'

LIC Dhan Varsha

LIC Dhan Varsha Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) धनवर्षा ही लोकप्रिय योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. धनवर्षा ही अशी एक आयुर्विमा योजना आहे ज्यात पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवेळी किमान 10 पट अधिक खात्रीशीर रक्कम मिळते.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) धनवर्षा ही लोकप्रिय योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. धनवर्षा ही अशी एक आयुर्विमा योजना आहे ज्यात एक वेळा प्रिमीयम भरुन पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवेळी किमान 10 पट अधिक खात्रीशीर परतावा मिळतो. धनवर्षा योजना 31 मार्च 2023 रोजी बंद होणार आहे. विमा कवच आणि खात्रीशीर परताव्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (LIC Dhan Varsha Policy Closed on 31st March 2023)

एलआयसी धनवर्षा योजनेत पॉलिसीधारकाला प्रिमीयमच्या रकमेने 10 पट अधिक खात्रीशीर रिटर्न मिळतो. एलआयसीने ऑक्टोबर 2022 या महिन्यात धनवर्षा योजना जाहीर केली होती. ही एक नॉन पार्टिसिपेटिंगस, पर्सनल, सिंगल प्रिमीयम आणि सेविंग विमा योजना आहे. ही योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते.  या योजनेत कमी वयात गुंतवणूक केली तर भक्कम रिटर्न आणि विमा कवच देखील मिळते. त्यामुळे तरुणांसाठी धनवर्षा लोकप्रिय विमा योजना ठरली आहे. या योजनेत किमान 15 वर्ष मुदतीसाठी विमा घेता येतो.  किमान 3 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष या वयोगटातील ग्राहक धनवर्ष विमा पॉलिसी खरेदी करु शकतात.

धनवर्षा योजनेत ग्राहकांना दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायात ग्राहकाकडून जमा केल्या जाणाऱ्या विमा प्रिमीयमवर 1.25 पट रिटर्न मिळतो. समजा ग्राहकांना 10 लाखांचा सिंगल प्रिमीयम भरुन पॉलिसी घेतली तर त्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास एलआयसी धनवर्षामधून अतिरिक्त बोनस म्हणून 12.5 लाखांचा गॅरंटिड रिटर्न मिळेल.

धनवर्षामधील दुसऱ्या पर्यायाची निवड केल्यास ग्राहकाला 10 पट अधिक जोखीम कवच मिळते. यात सिंगल प्रिमीयम भरलेला असल्यास आणि दुर्देवाने पॉलिसीधारकाचा अकस्मित मृत्यू झाल्यास नॉमिनीला एक कोटींपर्यंत भरपाई मिळू शकते. समजा 35 वर्षाचा व्यक्ती 10 लाखांचा विमा 15 वर्ष मुदतीसाठी दुसऱ्या पर्यायाने घेतला असले तर ग्राहकाला कर वगळता निव्वळ 874950 रुपयांचा एकदाच प्रिमीयम भरावा लागेल. यात गॅरंटेड अॅडिशन प्रती 1000 रुपयांवर 40 रुपये इतकी बेसिक सम अॅश्युअर्ड असेल.

ग्राहकाला मिळू शकतो 93 लाख रुपयांचा लाभ

जर पॉलिसी काळात 10 व्या वर्षी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 9149500 रुपयांची भरपाई मिळेले. यात 8749500 + 400000 रुपये अशी भरपाई मिळेल. जर 15 व्या वर्षी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला एकूण 9349500 रुपयांची (8749500 + 600000) अशी भरपाई मिळेल. मुदतपूर्तीपर्यंत पॉलिसीधारक जिवंत राहिला तर त्याला पॉलिसीमधून 1600000 (1000000+600000) असा लाभ मिळणार आहे.