Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pan Link with LIC Policy: एलआयसी ग्राहकांना केले आवाहन, 31 मार्चपूर्वी पॅनकार्ड विमा पॉलिसीशी लिंक करावे लागणार

LIC

Pan Link with LIC Policy: एलआयसी पॉलिसीधारकांना येत्या 31 मार्च 2023 पर्यंत महत्वाचे काम उरकावे लागणार आहे. पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक करावे लागेल. ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) पॉलिसीधारकांना महत्वाचे आवाहन केले आहे. येत्या 31 मार्च 2023 पर्यंत पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पॅनकार्ड इन्शुरन्स पॉलिसीशी लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.

एलआयसीचा विमा सेवा विनाअडथळा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरवर्षी एलआयसीकडून आर्थिक वर्षाअखेर अशा प्रकारचे आवाहन केले जाते, असे एलआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पॅनकार्ड विमा पॉलिसीसोबत लिंक करणे ही दरवर्षी न चुकता केली जाणारी प्रोसेसे आहे. पॅन लिंकींग करतानाच ग्राहकांनी मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी देखील अपडेट करावा, असे 'एलआयसी'ने म्हटले आहे.

सेबीने गुंतवणूकदारांना पॅन आणि आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर एलआयसीकडून पॅनकार्ड लिंकिंग प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. 31 मार्च 2023 पूर्वी पॅन लिंकिंग न करणाऱ्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होणार आहे.

एलआयसीच्या वेबपोर्टलवर जाऊन ग्राहकांना मोबाईल नंबर, पॅनकार्डवरील नावाचा तपशील सादर करावा लागणार आहे. त्यानंतर माहितीची छाननी होणार आहे. तपशीलाची खात्री पटल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो सादर केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचा एसएमएस येईल.

विमा बाजारावर 'एलआयसी'चे वर्चस्व

एलआयसीचे विम बाजारावर वर्चस्व आहे. एलआयचा मार्केटमध्ये सर्वाधिक 67.72% हिस्सा आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये खासगी विमा कंपन्यांचा विमा उद्योगाती हिस्सा 32.28% इतका होता. 'एलआयसी'चा हिस्सा 63.25% इतका होता. मागील वर्षभरात तो वाढला आहे. त्याशिवाय आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एलआयसीचा मार्केट शेअर 4.5% ने वाढल्याचे दिसून आले आहे. यात एलआयसीचा सिंगल प्रिमीयम 53% ने वाढला. नॉन सिंगल प्रिमीयम 14.6% ने वाढला.  

अशा प्रकारे तुम्ही पॅनकार्ड एलआयसी पॉलिशी लिंक करु शकता

  • Licindia.in या वेबपोर्टलला जा
  • पॅनकार्ड आणि विमा पॉलिसींचा तपशील तयार ठेवा
  • फॉर्ममधील तपशील भरा.
  • मोबाइल नंबर सादर करा
  • कॅपचा कोडचा तपशील द्या
  • मोबाइल नंबरवर OTP येईल. तो सादर करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल.