लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी ही भारतातील सर्वात विश्वसनीय विमा कंपन्यांपैकी एक आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या अनेक योजना आहेत. यामध्ये चाइल्ड सेव्हिंग प्लॅनचा देखील समावेश आहे. या योजना पालकांना आपल्या मुलांचे भविष्य (LIC Child Plans) सुरक्षित करण्यात मदत करतात. या याजनेच्या लाभातून मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर गरजा पूर्ण होऊ शकता. मूल लहान असतानाच योग्य नियोजन केले तर भविष्याची चिंता राहणार नाही. पाहूया, लहान मुलांसाठी एलआयसीच्या कोणत्या योजना आहेत.
एलआयसी जीवन तरुण योजना (Plan No. 934)
ही योजना मुलांसाठी सुरक्षा आणि बचत असे दोन्ही लाभ देते. सोबतच मुले मोठी होत असताना त्यांच्या शैक्षणिक आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी एलआयसीने ही योजना तयार केली आहे. बालकाचे कमीतकमी वय 90 दिवस ते जास्तीत जास्त 12 वर्ष वय असणाऱ्या बालके या याजनेसाठी पात्र असतील. या योजनेचा कालावधी 25 वर्षांचा आहे. एकूण पॉलिसी कालावधीपेक्षा पाच वर्ष कमी म्हणजेच जास्तीत जास्त 20 वर्ष प्रिमीयम भरावा लागेल. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार किती पैसे गुंतवायचे हे तुम्ही ठरवू शकता. या योजनेत कमीत कमी लाभ 75 हजार रुपये आहे. दोन वर्षानंतर या योजनेवर कर्जदेखील मिळू शकते तसेच बंद करू शकता.
या योजनेअंतर्गत 20 वर्षांपासून 24 वर्षांपर्यंत मुलांना सर्व्हायवल बेनिफिट आणि 25 वर्ष झाल्यानंतर पॉलिसीची एकूण रक्कम मिळेल.
पर्याय 1 - नॉन सर्व्हायवल बेनिफिट - पॉलिसी कार्यकाळ पूर्ण झाल्यावर १०० टक्के रक्कम मिळणार.
पर्याय 2 - पाच वर्षांसाठी पॉलिसीच्या एकूण रकमेच्या 5 टक्के रक्कम दरवर्षी मिळेल. तर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 75 टक्के रक्कम मिळेल.
पर्याय 3 - पाच वर्षांसाठी पॉलिसीच्या एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम दरवर्षी मिळेल. तर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 50 टक्के रक्कम मिळेल.
पर्याय 4 - पाच वर्षांसाठी पॉलिसीच्या एकूण रकमेच्या 15 टक्के रक्कम दरवर्षी मिळेल. तर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के रक्कम मिळेल.
LIC चा बाल भविष्य योजना (योजना क्रमांक. 185)
ही योजना मुलांच्या शैक्षणिक, विवाह आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पॉलीसी काळात मुलाला जीवन विमाही मिळतो. त्याशिवाय सात वर्षांपर्यंत जीवन विम्याचा लाभ वाढवता येऊ शकतो.
एलआयसीची न्यू चिल्ड्रन मनी बॅक योजना (प्लॅन क्र. 932)
ही विमा आणि गुंतवणूक योजना 0 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. ही एक नॉन-लिंक्ड मनी-बॅक योजना आहे. ही योजना फक्त 25 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे. समजा मुलाचे वय ५ वर्ष असेल तर 25 वजा 5 म्हणजे वीस वर्ष पॉलीसीची कार्यकाळ असेल. मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर एकूण विमा रकमेच्या 20 टक्के पैसे माघारी दिले जातील. तर 20 आणि 22 व्या वर्षी आणखी दोन वेळा ठराविक रक्कम दिली जाईल. मूल 25 वर्षाचे झाल्यानंतर एकूण रक्कम दिली जाईल.