Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या बिटटोरंट टोकनबद्दल सर्वकाही | BitTorrent Token (BTT)

जाणून घ्या बिटटोरंट टोकनबद्दल सर्वकाही | BitTorrent Token (BTT)

बिटटोरंट (BitTorrent) हे आजच्या घडीला जगातील सर्वात मोठे फाईल शेअरिंग प्लॅटफॉर्म असून त्यांना आपल्या ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी बिटटोरंट टोकन (BitTorrent Token) तयार केले.

सध्या बाजारात अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. आज आपण बिटटोरंट (BitTorrent) बद्दल जाणून घेणार आहोत. बिटटोरंट हे असं माध्यम आहे की, ज्याद्वारे आपण चित्रपट, गाणी, सॉफ्टवेअर आदी गोष्टी डाउनलोड करू शकता. बिटटोरंट हे यूटोरंट (U-Torrent) पेक्षा सामान्य आहे. बिटटोरंट टोकन हे ब्रॅम कोहेन (Bram Cohen) यांनी तयार केले होते. त्यांनाच बिटटोरंट टोकनचे जनक मानले जाते. ब्रॅम हे एक डेव्हलपर आणि उद्योजक होते. बिटटोरंट टोकन काय आहे? ते कसे वापरले जाते? त्याचा इतिहास काय आहे? त्यांची किंमत काय आहे? याची माहिती आपण घेणार आहोत.

बिटटोरंट (BitTorrent) हे आजच्या घडीला जगातील सर्वात मोठे विकेंद्रित (Decentralized) फाईल शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. याचा वापर विकेंद्रित पद्धतीने फाईल्स शेअर करण्यासाठी केला जातो. 2018 मध्ये बिटटोरंट ट्रोन फाऊंडेशनने (TRON Foundation) विकत घेतले.

बिटटोरंट टोकन काय आहे? (What is Bittorrent Coin?)

बिटटोरंटचा वापर करणाऱ्यांचा, याची सेवा घेणाऱ्यांचा या माध्यमावरील सहभाग वाढावा तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बिटटोरंट ही क्रिप्टोकरन्सी तयार करण्यात आली आहे. बिटटोरंट टोकन (BTT Coin) हा टीआरसी-10 (TRC-10) या क्रिप्टोग्राफिक टोकनच्या आधारे ब्लॉकचेनवर लॉंच करण्यात आले आहे. जसे इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कवर ईआरसी-20 (ERC-20) टोकन आहे.

बिटटोरंट टोकनचा वापर 

बीटीटी (BTT) म्हणून ओळखली जाणारी बिटटोरंट टोकन (BitTorrent coin) रिवॉर्ड म्हणून वापरली जातात. जर तुम्ही काही डाउनलोड करण्यासाठी बिटटोरंट, यू-टोरंट वेब (U-Torrent Web) किंवा यू-टोरंट क्लासिक (U-Torrent Classic) वापरत असाल, आणि तिथे खूपच हळुहळू डाउनलोड होत असेल. तर तुम्ही बीटीटी टोकन वापरून त्याचा डाउनलोड स्पीड वाढवू शकता. जसे की, नॉर्मल स्थितीमध्ये तुमचा डाऊनलोड स्पीड 500 KBPS येत असेल तर बिटटोरंट टोकनच्या मदतीने तुम्ही त्याचा स्पीड 1 Mbps पर्यंत वाढवू शकता.

भारतात बिटटोरंट टोकन कसे खरेदी करता येते?

भारतात कोणतीही क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टो टोकन खरेदी करण्यासाठी, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर नोंदणी करावी लागते. बिटटोरंट टोकनसाठीही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर नोंदणी करावी लागेल.