Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Price Increase or Decrease in 2022; आपण काय करावे?

Laptop Price Increase or Decrease

Decline in Laptop Sales : सद्यस्थितीत पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची (Personal Computer & Laptop) विक्री मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी घसरली. कोरोना महामारीमुळे त्या काळात पीसीच्या विक्रीत वाढ झाली होती. त्यावेळी अनेकांनी नवीन कॉम्प्युटर विकत घेतल्यामुळे कॉम्प्युटरच्या किमतीत घसरण झाली.

Laptop Price Drop : युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धामुळे आणि जगभर सुरू असलेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे काही गोष्टींवरील खर्च कमी होऊ लागला आहे. परिणामी खर्चाच्या डिमांड लिस्टमधून कॉम्प्युटर/लॅपटॉप मागे पडू लागला. जागतिक पातळीवर 2022 मध्ये कॉम्प्युटरची विक्री तब्बल 19.5 टक्क्यांनी घसरली. गार्टनर या जागतिक संस्थेने 1990 च्या दशकापासून कॉम्प्युटर विक्रीचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट असल्याचे मानले जात आहे. तर रिसर्च फर्म IDC (International Data Corporation)ने केलेल्या संशोधनानुसार कॉम्प्युटर/लॅपटॉप विक्रीमध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली आहे.

कोरोनाकाळापुरती कॉम्प्युटरची मागणी वाढली!

आयडीसीच्या मोबिलिटी आणि कंझ्युमर डिव्हाईस ट्रॅकर्सचे (Consumer device trackers) संशोधन व्यवस्थापक जितेश उब्रानी यांच्या मते, कोरोना महामारीशी लढत असताना व्यावसायिक कंपन्या आणि शाळांनी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही पद्धत वापरली. त्यामुळे त्या काळात नवीन कॉम्प्युटर/लॅपटॉपची मागणी वाढली होती आणि ती पूर्ण सुद्धा झाली. 

लिनोवा कंपनी 25 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर!

एका सर्व्हेक्षणानुसार जागतिक पातळीवर 74.3 मिलिअन एवढी कॉम्प्युटरची विक्री झाली. यात जगभरातील 3 नामांकित कंपन्या अग्रेसर आहेत. एकूण मार्केटमधील लिनोवा (Lenovo) कंपनीचा 25.2 टक्के, एचपी (HP) कंपनीचे 18.7 टक्के आणि डेल (Dell) कंपनीचा 17.7 टक्के इतका कॉम्प्युटर विक्रीतील वाटा आहे. त्यानंतर Apple, Asus आणि Acer या कंपन्यांचा अनुक्रमे 8.5%, 8.2% आणि 6.6%  वाटा आहे. 

नवीन सॉफ्टवेअचाही विक्रीवर परिणाम नाही!

विंडोज 11 (Windows 11) ऑक्टोबर 2021 मध्ये लॉण्च झाल्यापासून अलीकडेच त्याचे पहिले वार्षिक अपडेट आले. त्याचादेखील नवीन कॉम्प्युटर विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही, असं सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांना आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षांत बाजारपेठेत कॉम्प्युटरचा पुरवठा मर्यादित होता. त्यामुळे लोक ओएसची (Operating System-OS) पर्वा न करता पीसी खरेदी करत होते.

एकूण जागतिक पातळीवर कॉम्प्युटरच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशी स्थिती प्रथमच अनुभवत असल्याचे HP कंपनीने म्हटले आहे. डेस्कटॉप मार्केटमधील काही क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे; पण एकूण लॅपटॉप शिपमेंटमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. डेल कंपनीने आशिया-पॅसिफिक वगळता इतर सर्व ठिकाणी डेस्कटॉप मार्केटमधील विक्रीत वाढ नोंदवली आहे. तर डेल कंपनीच्या लॅपटॉप शिपमेंटमध्ये जपान वगळता इतरत्र घट झाल्याचे दिसून आले.