LMDTE: लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट तर्फे संपूर्ण भारतातून पदवीधर महिलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाते.
शिष्यवृत्ती कोणाला मिळू शकते?
लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्टतर्फे देशभरातील पदवीधर महिलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायदा, शिक्षण, विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण आणि कल्याण, लिंग अभ्यास, महिला आणि मुलांवरील हिंसाचार, घरगुती हिंसाचार, मुलांचा विकास आणि पोषण, आरोग्य धोरण आणि आरोग्य शिक्षण- मानसिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, मुलांच्या गरजा, विकासासाठी जनसंवाद, प्रजनन आरोग्य, सामाजिक नियमांवर संशोधन आणि अभ्यास, विकास अभ्यासक्रम या विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
LMDTE शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता
igpedulmdtet@tatatrusts.org. या लेडी मेहेरबाई टाटा शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र महिलांची निवड इंटरव्यूच्या माध्यमातून होत असते. तसेच, नामांकित विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण केलेले असावे. शैक्षणिक अभ्यासक्रमात सातत्याने चांगली कामगिरी केलेली असावी. या शैक्षणिक सत्रासाठी अमेरिका, युनायडेट किंगडम (युके) किंवा युरोपमधील कोणत्याही नामांकित विद्यापीठात अर्ज केलेला असावा. तसेच यासाठी किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
निवड प्रक्रिया काय आहे
अधिकृत वेबसाईटवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. तसेच त्यांची वैयक्तिक किंवा ऑनलाईन मुलाखत घेतली जाते. मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना 'प्रुफ ऑफ फंड्स'ची प्रत सादर करावी लागते. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या गुणांवर त्यांना 3 ते 6 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.