रिझर्व्ह बॅंकने रेपो दरात केलेल्या वाढीमुळे फिक्स्ड डिपाॅझिटचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. तसेच, बऱ्याच बॅंका त्यांच्या फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये वाढ करताना दिसत आहे. त्यामुळे तुम्ही देखील गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेच्या एफडीचा लाभ घेऊ शकणार आहात. बॅंकेने त्यांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीच्या व्याजदरात बदल केले आहे. बॅंकेच्या वेबसाईटनुसार हे नवीन बदल 13 सप्टेंबरपासून लागू केले आहेत.
या अवधीच्या एफडीवर मिळतोय अधिक रिटर्न
खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बॅंकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. या बदलानंतर, बॅंक आता 23 महिन्यांच्या अवधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि सामान्यांसाठी 7.25 टक्के व्याज देत आहे. त्यामुळे तुम्ही जर अल्प मुदतीसाठी गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असल्यास, या अवधीच्या एफडीत तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात.
बॅंकेचे नवीन दर
बॅंक 7 ते 14 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 2.75 टक्के व्याज देत आहे, तर 15 ते 30 दिवसांच्या एफडीवर 3.00 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच, बॅंक 31 दिवस आणि 45 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3.25 टक्के आणि 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज देत आहे. 91 दिवस ते 120 दिवसांच्या एफडीवर 4.00 टक्के व्याज मिळत आहे. तर 121 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर बॅंक 4.25 टक्के व्याज देत आहे.
तसेच, बॅंक 180 दिवसांच्या एफडीवर 7.00 टक्के व्याज देत आहे आणि 181 दिवस ते 363 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 6.00 टक्के व्याज दिल्या जात आहे. याशिवाय 364 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्के आणि 365 दिवस ते 389 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देत आहे. 390 दिवसांच्या (12 महिने 25 दिवस) एफडीवर बॅंक 7.15 टक्के आणि 391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज मिळत आहे.
तर बॅंक 23 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के आणि 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी अवधीच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी अवधीच्या एफडीवर 7 टक्के आणि 3 वर्षे ते 4 वर्षांपेक्षा कमी अवधीच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच, 4 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.20 टक्के दराने व्याज मिळत आहे.
प्री-मॅच्युअर पर्याय उपलब्ध
कोटक महिंद्रा बॅंकेत तुम्ही 5,000 रुपयांपासून एफडीत गुंतवणूक करु शकता. तसेच, गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. ग्राहक प्री-मॅच्युअर पर्याय निवडू शकतात. पण, त्यासाठी त्यांना 1 टक्के दंड द्यावा लागू शकतो. तसेच, एफडीच्या दरात सामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 50 बेसिस पाॅईंट जास्त आहे.