Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kotak Mahindra Bank बिग फेस्टीव्हल धमाका; 10 हजारांहून अधिक प्रॉडक्टसवर ऑफर!

Kotak Mahindra Bank Big Festive Dhamaka

Image Source : www.kotak.com

कोटक महिंन्द्राच्या खुशी का सीझन या ऑफर अंतर्गतत डायनिंग, ट्रॅव्हल, ऑनलाईन फॅशन, किराणा, रिटेल स्टोअर्स, ज्वेलरी, मॉल्स, ऑनलाइन डिलिव्हरी, हेल्थकेअर आणि होम सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीतील 10 हजारांहून अधिक प्रोडक्टसवर ऑफर्स दिल्या आहेत.

कोटक महिंद्रा बॅंकेने (Kotak Mahindra Bank) सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खास खुशी का सीझन (Khushi Ka Season-KKS) ऑफरचा पाचवा हप्ता लॉन्च केल्याची घोषणा केली. कोटक महिंन्द्राने या ऑफर अंतर्गतत डायनिंग, ट्रॅव्हल, ऑनलाईन फॅशन, किराणा, रिटेल स्टोअर्स, ज्वेलरी, मॉल्स, ऑनलाइन डिलिव्हरी, हेल्थकेअर आणि होम सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीत 10 हजारांहून अधिक ऑफर्स दिल्या आहेत.

खुशी का सिझन या ऑफरद्वारे ग्राहक सॅमसंग, ऑप्पो, शिओमी, आयएफबी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या इलेकट्रॉनिक आणि स्मार्टफोन कंपन्यांच्या प्रोडक्टसची खरेदी कोटक महिंन्द्राच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर करू शकतात. या कार्डवर अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, Myntr, Ajio, पूमा, झोमॅटो, डीमार्ट, मेकमाय ट्रीप, बिग बास्केट, Yatratrip यासारख्या प्लॅटफॉर्मवर सेल दरम्यान मेगा डिस्काऊंट आणि कॅशबॅक दिली जाणार आहे.

कोटम महिंन्द्रा बॅंक लिमिटेडच्या (Kotak Mahindra Bank Limited-KMBL) 'Everyday Special' कॅटेगरी अंतर्गत, 10 हून अधिक ब्रॅण्ड्सवर ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यात आठवड्याचे सर्व दिवस खरेदी करता येणार आहे. या सर्व ऑफर फक्त KMBL डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांसाठीच उपलब्ध आहेत.

कोटक महिंन्द्रा बॅंकेचा खुशी का सीझन हा पुन्हा नव्या दमाने आला आहे. यावर्षी मोठमोठ्या ब्रॅण्ड्सवर चांगल्या ऑफर्स आहेत. या ऑफर्समध्ये प्रत्येकासाठी काही ना काही नक्की आहे. जसे की कोणासाठी किराणा सामान, फूड डिलिव्हरी, कपडे, स्मार्टफोन, प्रवास अशा बऱ्याच ऑफर्स आम्ही घेऊन आलो आहोत, अशी माहिती कोटक महिंन्द्रा बॅंकेचे विराट दिवाणजी यांनी सांगतले.

या खुशी का सीझनचा आनंद घेत ग्राहक या सणासुदीच्या हंगामात खरेदी करून भरपूर सवलत आणि कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच या वस्तू खरेदी करण्यासाठी EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. ग्राहकांना एक आनंददायी बँकिंग अनुभव देण्यासाठी कोटक महिंन्द्रा सतत प्रयत्नशील असते, असेही दिवाणजी यांनी सांगितले.