Chips Companies Fill Packets with Air: भारतात चीप्स हा पदार्थ मोठया प्रमाणात खाल्ला जातो. कॉलेजचा कट्टा असो किंवा ट्रीप असोकिंवा लांब पल्ल्याचा प्रवास असो...चटपटीत व हलके-फुलके चीप्स सगळ्यांच्या बॅगमध्ये असतात. त्यामुळे या चीप्सचा खप भारतातदेखील जास्त होतो. पण हे चीप्सचे पॅकेट हातात आले की, प्रत्येकाच्या मनात एकदा तरी शंका येते की, यामध्ये हवा का असते, यावर अनेक टिका-टिप्पणीदेखील झाली. मात्र याचे उत्तर मिळाले नाही. याचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
नकारात्मक टिका-टिप्पणी
चीप्सच्या पॅकेटमध्ये अधिक हवा असण्यामागे, कित्येक लोकांना नकारात्मक मते व्यक्त केली आहेत.जसे की, चीप्सच्या पॅकेटचे वजन वाढवण्यासाठी ही हवा भरली जात असावी. तर काही लोक म्हणतात की, केवळ पॅकेट छान व आकर्षक दिसावे यासाठी ही हवा भरली जाते. तर काहीजण पैसे कमविण्यासाठी कंपन्या चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरतात, अशा विविध अफवा म्हणा किंवा कारणे आपण ऐकली आहेत.
पॅकेटमध्ये हवा का असते?
पॅकेटमध्ये हवा असण्याचे सत्य पहिले कारण म्हणजे चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरुन ते पॅकेट दुकानदारांपर्यंत पोहचिवण्यासाठी अधिक खर्च येतो. यामुळे चिप्सचा दर देखील वाढतो. असे असून सुद्धा कंपन्यांना पॅकेटमध्ये गॅस भरणे आवश्यक असते. समजा, जर चिप्सच्या पॅकेटमध्ये गॅस भरला नाही तर, फॅक्ट्रीमधून चिप्स तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा पूर्ण चूरा होईन आणि ते तुमच्या खाण्यायोग्य राहणार नाही. आणखी एक सत्य म्हणजे,चिप्सच्या पॅकेटमध्ये ऑक्सिजन किंवा हवा नसते, तर तो नायट्रोजन गॅस भरला जातो. कारण, चिप्स तयार करताना बटाट्याचे लहान तुकडे केले जातात. यावेळी वातावरणातील काही घटकामुळे बटाट्याच्या चिप्समध्ये बॅक्टीरिया तयार होतो. हा पदार्थ बाहेर उघड्यावर म्हणजे हवेत ठेवला तर तो खराब किंवा नरम होतो. त्यामुळे ते खाण्यास चविष्ट राहत नाही. शिवाय नरम झालेले पदार्थ आपणाला खावेसे वाटतं नाहीत. नायट्रोजन पॅकेटमध्ये इतर कोणत्याही गॅसप्रमाणे रासायनिक क्रिया करत नाही. त्यामुळे चिप्स कुरकुरीत, फ्रेश आणि चविष्ट रहावेत म्हणून पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो.