Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: जाणून घ्या, पोस्टाच्या कोणत्या योजनेत एफडीपेक्षा ही सर्वाधिक व्याज मिळते

Post Office Scheme

Image Source : http://www.thehindubusinessline.com/

Post Office Scheme: तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, पण कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घ्या पोस्ट आॅफिससारख्या अनेक सुरक्षित अशा योजना आहेत, जिथे एफडीपेक्षा ही सर्वाधिक व्याज मिळते. या अनेक योजनेबाबत जाणून घेवुयात.

Which Post Office Scheme is Best: रोजच्या धावपळीच्या व महागाईच्या दुनियेत गुंतवणूक करणे खूप महत्वाचे आहे. अचानक कधी ही काहीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुक ही प्रत्येकानेच केली पाहिजे. कारण हातातून अचानक नोकरी केली किंवा अचानक आलेले आजारपण. अशा कठीण परिस्थितीत गुंतवणूक केलेला पैसा हा मदतीला येतो. त्यामुळे कोणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या योजना फायदेशीर व सुरक्षित आहेत, हे पाहुयात.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना (Post Office Time Deposit Scheme)

पोस्टाची ही योजना खूप कमी कालावधीसाठी असून फायदेशीर आहे. या योजनेचे नाव आहे, ‘पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना.’ पोस्टाची ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच ही लहान बचत योजनांपैका एक आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा असून ही 6.7 टक्के परतावा देते. ही योजना पुन्हा तुम्ही दर पाच वर्षांनी हा कालावधी तुम्ही वाढवून देखील घेऊ शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान दोनशे रूपये तरी जमा झालेले असावे. या योजनेसाठी तुम्ही एक नाही अनेक खाते देखील उघडू शकता. या योजनेच्या खात्यांच्या संख्येवर कोणतेही मर्यादा नाही.  त्यामुळे हा पर्याय दीर्घकाळ बचतीसाठी हमखास फायदेशीर आहे.

सीनिअर सिटीझन सेव्हिंग योजना (SCSS)

सीनिअर सिटीझन सेव्हिंग योजना (Senior Citizen Saving Scheme) ही फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू आहे. ही तुम्ही केलेल्या बचतीवर  8 टक्के इतके व्याज देते. ही एकदम सुरक्षित योजना असून यामध्ये कोणताही धोका नाही.  या योजनेचा लाभ साठ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती घेऊ शकतात. वृध्द लोकांसाठी हा एक चांगला व फायदेशीर पर्याय आहे.