Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Devgan New Car: जाणून घ्या, सिंघम अजय देवगणने कोणती लक्झरी कार खरेदी केली, त्याची किंमत व फीचर्स

Ajay Devgan New Car

Image Source : http://www.mediawire.in/

Ajay Devgan: बाॅलिवुडचा सिंघम अजय देवगण या कलाकाराने एक लक्झरी कार खरेदी केली आहे. या राॅयल गाडीची किंमत एेकून तुम्ही थक्क व्हाल. या गाडीचे नाव, किंमत व फीचर्सबाबत जाणून घेवुयात.

Ajay Devgan Latest News: दृष्यम, दृष्यम 2, सिंघम, तानाजी असे एक ना एक सुपरहीट चित्रपट देणारा बाॅलिवुडचा अभिनेता अजय देवगण याने एक आलिशान गाडी घेतली आहे. या गाडीची सध्या सोशलमिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या आलिशान गाडीचे नाव, किंमत व फीचर्सबाबत जाणून घेवुयात.

गाडीचे नाव व किंमत (Car Name and Price)

बाॅलिवुड सुपरहीट अभिनेता अजय देवगण याच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. त्याला कार्सची प्रचंड आवड आहे. तो महागडया खरेदी करणे पसंद करतो. सध्या त्याने मर्सिडीज मे-बॅक DGLS600 (Mercedes Maybach GLS 600) ही आलिशान गाडी खरेदी केली आहे व त्याच्या या गाडीची किंमत सुमारे 3 कोटी आहे.

या कारचे फीचर्स (Features of this Car) 

अजय देवगण मर्सिडीज मे-बॅक DGLS600 ही लक्झरी गाडी केली आहे. या गाडीचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये 3982 सीसीचे इंजिन आहे. ही एक पाच सीटर कार आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट्स आहेत. तसेच 12.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्लेदेखील आहे. या कारची चाके मिश्र धातुपासून तयार करण्यात आली आहेत. या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि फ्लेक्झिबल स्टियरिंग सुध्दा आहेत. ही एक महागडया गाडीपैकी एक आहे.

 लक्झरी गाडयांचा मालक (Owner of Luxury Cars)

अजय देवगणकडे एकापेक्षा एक भारी लक्झरी कार्स आहेत. यामध्ये Rolls-Royce Cullinan या महागडया कारचा समावेश आहे. जगातील सर्वात महाग असणाऱ्या SUV मध्ये या कारची गणना केली जाते. त्याच्या या आलिशान गाडीची किंमत सुमारे 6.95 कोटी आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे रेंज रोव्हर ऑडीसह इतर 6 गाड्या महागडया गाडया आहेत.