Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KCC: किसान क्रेडिट कार्डवरून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कधी पर्यंत मिळणार, जाणून घ्या

Kisan Credit Card, KCC, Kisan Credit Card Process

Image Source : http://www.eseva.csccloud.in/

KCC 2022:सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या कृषी आणि त्यावर आधारित कामकाजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

Kisan Credit Card: KCC मार्फत सवलतीच्या व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंतच्या एकूण मर्यादेपर्यंत पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि मधमाशीपालन यासह कृषी आणि त्या संबंधित काम काजासाठी  शेतकऱ्यांना अल्पकालीन पीक कर्ज देण्यासाठी सरकार बँकांना अनुदान देते. विशेष म्हणजे केंद्राच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सात टक्के सवलतीच्या दराने कर्ज मिळते. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक तीन टक्के अतिरिक्त व्याज सवलत दिली जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजना Kisan Credit Card Scheme

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) हे अल्प कालावधीसाठी दिले जाणारे कृषी कर्ज आहे. वर्षभरात शेतीवर होणारा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना KCC कर्ज दिले जाते. हे सरकार प्रादेशिक ग्रामीण बँका आणि इतर सरकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना दिले जाते. ज्याचा उपयोग शेतकरी प्रामुख्याने पीक पेरणी, बियाणे, खते, शेती आणि पीक विमा यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी करतात. जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि खसरा, खतौनी यांसारखी शेतजमिनीची कागदपत्रे आणि शेअर सर्टिफिकेट बँकेत न्यावे लागेल. कर्ज देण्यापूर्वी बँक तुमचा CIBIL चेक करतात. CIBIL रिपोर्ट  (Credit report) बरोबर असेल तरच बँक तुम्हाला कर्ज देईल. या कागदपत्रांसह तुम्ही कृषी कर्जासाठी अर्ज देऊ शकता.

पुढील दोन वर्षांसाठी दिली जाणार मदत 

रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की, 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी कर्ज देणाऱ्या संस्थांना व्याज सवलतीचा दर 1.5 टक्के असेल. तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ही मदत रक्कम दोन टक्के होती. कालावधी वाढल्याने ती अर्धा टक्‍क्‍यांने कमी झाली आहे. म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ मिळणार आहे. 

शेतकऱ्यांना स्वस्तात माल विकण्याची सक्ती केली जाणार नाही

शेतकऱ्यांना घाबरून विक्री करण्यापासून परावृत्त करून, गोदामांमध्ये त्यांचा माल साठवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. मान्यताप्राप्त गोदामांमध्ये ठेवलेल्या उत्पादनांच्या पावत्यांविरुद्ध काढणीनंतर सहा महिन्यांपर्यंत व्याज सवलतीचा लाभ लहान शेतकऱ्यांना दिल जाईल.