• 27 Sep, 2023 01:25

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Bank Home Loan rate: नवं घर घ्यायचंय? मग HDFC बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर चेक करा

HDFC home loan rate

Image Source : www.hdfcbank.com

गृहकर्जाचा व्याजदर कमी म्हणजे EMI देखील कमी भरावा लागेल. घर घेताना कोणती बँक सर्वात कमी व्याजदर देत आहे याचा ग्राहक शोध घेत असतात. या लेखात पाहूया HDFC बँकचे गृहकर्जावरील व्याजदर किती आहेत.

HDFC Bank Home Loan rate: घरांच्या किंमती वाढत असतानाही ग्राहक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीस पसंती देत आहेत. पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबादसह देशातील मोठ्या शहरात घरांच्या किंमती वाढल्या आहेत. दरम्यान, होम लोनसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमीत कमी व्याजदराने कोणती बँक कर्ज  देते याकडे ग्राहकांची नजर असते. पाहूया एचडीएफसी बँक होम लोनवर किती टक्के व्याज आकारते.

HDFC बँक होम लोन व्याजदर काय आहे?

HDFC बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार बँक स्पेशल होम लोन आणि स्टँडर्ड होम लोन अशा दोन प्रकारचे कर्ज पगारदार आणि बिगर पगारदार ग्राहकांना देते. दोन्हीतील व्याजदरात थोडा फरक आहे. 

स्पेशल होम लोन (पगारदार आणि बिगर पगारदार) 

सध्या रेपो रेट 6.50% आहे. त्यावर 2% ते 2.65% टक्के अधिक व्याजदर बँकेकडून आकारण्यात येत आहे. म्हणजेच फ्लोटिंग रेटनुसार ग्राहकांना 8.50% ते 9.15% दरम्यान व्याजदर लागू होईल. रेपो रेट कमी जास्त झाल्यास व्याजदर आणि EMI मध्ये बदल होईल. 

स्टँडर्ड होम लोन (पगारदार आणि बिगर पगारदार) 

सध्या रेपो रेट 6.50% आहे. त्यावर 2.25% ते 2.90% टक्के अधिक व्याजदर बँकेकडून आकारण्यात येत आहे. म्हणजेच फ्लोटिंग रेट नुसार ग्राहकांना 8.75% ते 9.40% दरम्यान व्याजदर लागू होईल. रेपो रेट कमी जास्त झाल्यास व्याजदर आणि EMI मध्ये बदल होईल. 

कोणत्या गोष्टींवर व्याजदर ठरतो?

तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज केल्यास सर्वात कमी व्याजदर मिळेल याची खात्री नाही. कारण तुमचा सिबिल स्कोअर, आधीचे कर्ज, बँकेसोबतचे व्यवहार, कर्जाची रक्कम, कार्यकाळ, तुमचे उत्पन्न, कुटुंबाचे उत्पन्न अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. 

बँक जोखीम पडताळून कर्ज मंजूर करते. जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर व्याजदर जास्त लागू होते. म्हणजेच तुम्हाला जास्त इएमआय भरावा लागेल. मात्र, जर सिबिल स्कोअर चांगला असेल तर कमी व्याजदर लागू होईल. बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही किती EMI येईल हे कॅलक्युलेट करू शकता.