Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

QR CODE SCAM: जाणून घ्या असा होतो क्यूआर कोड स्कॅम आणि त्याचा खोटा बाजार!

QR CODE SCAM

QR CODE SCAM: एखाद्या टेकनॉलॉजीचा वापर जसा फायदेशीर असतो तसाच तो घातक असतो. कारण त्याचा गैरवापर करणारे कमी नाहीत. सध्या क्यूआर कोडचा वापर करून लोकांना फसवले जात आहे.

तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, क्यूआर कोड स्कॅन (QR CODE SCAN) केल्यानंतर काही गडबड होऊ शकते? आजच्या टेकनॉलॉजीच्या (technology) काळात क्यूआर कोड ही संकल्पना खूप प्रमाणात वापरात आहे. हॉटेल्स, पार्किंग, शॉपिंग अशा अनेक गोष्टींसाठी आपण ऑनलाईन ऑफलाईन क्यूआर कोडचा वापर करत असतो. आणि कॅशलेस ट्रॅन्झॅक्शन या माध्यमातून करतो. त्यामुळे क्यूआर कोडचा वापर आजकाल सर्रास होताना आपल्याला पाहायला मिळतो. 

क्यूआर कोड स्कॅम म्हणजे काय? What is QR Code Scam?

एखाद्या टेकनॉलॉजीचा वापर जसा फायदेशीर असतो तसाच तो घातक असतो. कारण त्याचा गैरवापर करणारे कमी नाहीत. जसं कॅशलेस ट्रँझॅकशनसाठी एकीकडे बोललं जात आहे तर दुसरीकडे कॅशलेस पेमेंट करणाऱ्या क्यूआर कोडच्या खोट्या क्यूआर कोड फिशींग (QR Code Phishing) किंवा क्यूआर कोड घोटाळ्यांबद्दल तितकंच सावधही केले जाते. क्यूआर कोड वापरणाऱ्यांना टार्गेट करून हे फ्रॉड केले जातात. ई- मेल स्पूफिंग (Email spoofing) प्रमाणेच, हा फ्रॉड केला जातो.  ज्यात ऑनलाईन पेमेंट (online payment) करणाऱ्यांना एखादे गिफ्ट व्हाऊचर (gift voucher) मिळाले आहे असे सांगून, त्यांना त्यासाठी एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे, असे सांगितले जाते.

क्यूआर कोडचा वापर | Use of QR Code

क्यू आर कोड (Quick Response code) कोठेही पाहिले जाऊ शकतात. उदाहरणार्थ- प्रॉडक्ट पॅकेजिंग, न्यूजपेपर, पोस्टर्स, तिकिट्स इत्यादी. असे कोड विविध वेबसाईट (websites), पेमेंट सिस्टिम्स (payment systems) आणि बुकिंग्स (bookings) अशा अनेक ठिकाणीही असतात. क्यू आर कोड स्कॅन करू शकणाऱ्या मोबाइल ॲप्समुळे त्यांची लोकप्रियता वाढली. आजकाल अनेक अँड्रॉईड (Android) आणि आयओएस कॅमेरा (IOS Camera) कोणत्याही थर्ड पार्टी टूल (Third Party Tool) चा वापर न करता असे कोड वाचू शकतो. त्यामुळे क्यू आर कोड वापरण्याचे मार्ग निर्माण होत आहेत. 

कोविडच्या काळात क्यू आर कोडच्या वापरात वाढ झाली. नॉर्मल मनी ट्रान्सफर/कॅश ट्रान्सफर (Normal money transfer / cash transfer) कमी होत गेले.  रेस्टॉरंट्सने आणि इतर ठिकाणीही, आपल्या स्वत: च्या वैयक्तिक फोनवर उपलब्ध असलेल्या; ऑनलाइन क्यू आर कोडसह सर्व ग्राहकांना पेमेंट सिस्टिम्सची माहिती करून देण्यात आली आणि त्यानुसार पेमेंट करण्यास सांगितले. 


कसा होतो क्यूआर कोड स्कॅम? How does a QR code scam happen?

क्यूआर कोड स्कॅम हा साधारण आपण एखादी वस्तू विकत घेतल्यास किंवा कुठे पेमेंट केल्यास होतो असा अनेक जणांचा समज आहे. परंतु हा स्कॅम तेवढ्या पुरताच मर्यादित नसून, ह्याचे अनेक असे प्रकार आहेत.  जिथे एका क्लिकवर आपली माहिती घेऊन, सरळ आपल्या बँक अकाउंट (bank account) शी जोडून पैसे काढले जातात. त्यातले काही प्रकार आपण आता पाहू.

क्यू-आर कोड व्हायरस (QR CODE VIRUS) 

बऱ्याच प्रकरणांमध्ये, मालवेअर (Malware)ला म्हणजेच सायबर क्राईम (cybercrime) करणाऱ्याला नुकसान करण्यासाठी समोरच्याने फक्त क्यू आर कोड स्कॅन करणं पुरेसं आहे. हे शक्य आहे कारण काही वेबसाईट्स आपण भेट देता क्षणीच अनएथिकल सॉफ्टवेअर (unethical software) त्यांचे ड्राईव्ह बाय डाउनलोड्स ऑटोमॅटिकली (drive by downloads automatically) सुरू करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण क्यू आर कोडद्वारे भेट दिलेली वेबसाईट पाहण्यासाठी आपल्या डिवाइस (device) वर कीलॉगर(keylogger) डाउनलोड करण्यास सांगतात. या प्रकारचे मालवेअर आपल्या पर्सनल आणि संवेदनशील (sensitive) माहितीसह आपण टाइप केलेल्या गोष्टीची नोंद ते आपल्या नकळत करत असते. 

क्यूआर कोड मालवेअर फ्रॉड | QR CODE Malware Fraud

अलीकडील क्यूआर कोड फ्रॉड मालवेअर (QR CODE Malware fraud) अँड्रॉईड फोनला टार्गेट करतो. कॅस्परस्की (Kaspersky) च्या सिक्युअर लिस्ट (secure list) नुसार, क्यू आर कोड स्कॅन केल्याने एक पेज येते, जिथे आपण एक धोकादायक ट्रोजन हॉर्स डाऊनलोड (trojan horse download) करतो. जिथे अँड्रॉइड डिव्हाइससाठी सामान्य फाईल म्हणून लपवून ठेवली जाते. हा ट्रोजन हॉर्स एकदा इन्स्टॉल केल्यावर एका फोन नंबरवर टेक्स्ट मेसेज (text message) पाठवतो, जो प्रत्येक मेसेजला 6 डॉलर प्रति मेसेज चार्ज करतो. घोटाळेबाज हे पैसे खिशात घालून संपवतात.

क्यूआर पेमेंट फ्रॉड (QR Payment Fraud)

क्यूआर फसवणुकीच्या दुसऱ्या प्रकारात क्यूआर कोड मध्ये छेडछाड करणे किंवा अशा ठिकाणी फसवे कोड ठेवणे समाविष्ट आहे जेथे बरेच ऑनलाइन पेमेंट केले जाते, जसे की गॅस स्टेशन्स जे क्यूआर कोडद्वारे देय देण्यास परवानगी देतात. गुन्हेगार त्यांचे कोड वापरले जावेत यासाठी कायदेशीर क्यूआर कोड देखील लपवू शकतात.

आता ईमेल प्फिशिंग फ्रॉड (email phishing fraud) वर सायबर गुन्हेगारांकडून अनेकदा खोटी माहिती दिली जाते. बोगस क्यू आर कोड स्कॅन केल्यास तुमच्या फोनला काहीही होणार नाही, जसे की बॅकग्राऊंडमध्ये मालवेअर डाऊनलोड करा. परंतु ते आपल्याला सरळ आपल्या बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड्स किंवा इतर पर्सनल इन्फॉर्मेशन मिळविण्यासाठी डिझाइन केलेल्या स्कॅमी वेबसाईट्स (scammy websites) वर घेऊन जातो आणि तुमच्या सोबत फ्रॉड होतो. समस्या अशी आहे की, सायबर (Cyber) गुन्हेगारांना क्यू आर कोडच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती आहे आणि सिक्युरिटी टेकनिशिअन्स (security technicians) ना त्यांना पकडणे काही वेळा कठीण जाते.