शेअर मार्केटचे आकर्षण वाढताना दिसत आहे. यात Intra-day हे पूर्णवेळ रोजगाराचे साधन आहे, असा विचार करणारे देखील अनेक जण दिसतात. काही जण तर जॉब सोडून पूर्णवेळ Share market ट्रेडिंग करण्याचा विचार करतात. रोजगाराची निवड करणे हा वैयक्तिक निर्णय असतो. मात्र त्याआधी यातला धोका जाणून घेणे आवश्यक आहे.
Share Market मधील मिळकत अनिश्चित
Share Market मधील मिळकत ही अनिश्चित असते. ती बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते. शेअर मार्केटमध्ये अनेक चढ-उतार होत असतात. तुलनेने जॉब एक निश्चित उत्पन्न देत असतो. केलेल्या कामाचा आपल्याला निश्चित पगार मिळत असतो. तसे Share Market च्या बाबतीत होताना दिसत नाही. यामुळे उत्साहाच्या भरात हा निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते.
बाजाराचा सखोल अभ्यास आवश्यक
अधून मधून बातम्या किवा एखाद्या आधारावर एखाद-दुसरे ट्रेडिंग करून त्यात नफाही मिळू शकते. यामुळे Share Market अधिक फायदेशीर आहे असे वाटू लागते. ठराविक तास जॉब करून एक ठराविक रक्कमच मिळते त्यापेक्षा शेअर बाजारात खूप जास्त पैसे मिळतात असे वाटणे साहजिक आहे. मात्र, अधूनमधून पैसे मिळणे आणि त्यात सातत्य राहणे या वेगळ्या गोष्टी आहेत.
Share Market मध्ये कायम राहण्यासाठी बाजाराचा सखोल अभ्यास अभ्यास महत्वाचा असतो. कंपन्यांचा फंडामेंटल अभ्यास करणे देखील महत्वाचे मानले जाते. डे ट्रेडिंग करताना टेक्निकल अनॅलिसिस महत्वाचे ठरते. याचा सखोल आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते.
कोणत्या आर्थिक जवाबदऱ्या आहेत?
शेअर मार्केटचा पूर्णवेळ रोजगार म्हणून विचार करताना त्यातले उत्पन्न अनिश्चित असते. हा एक प्रकारचा बिझनेस मानला जातो, हे समजून घ्ययला हवे. यामुळे ज्याच्यावर निश्चित काही आर्थिक जवाबदऱ्या आहेत, त्याच्यासाठी जॉब सोडून पूर्णवेळ Share Market चा निर्णय घेणे योग्य मानले जात नाही. जॉबमध्ये निश्चित उत्पन्न मिळत असते. यामुळे कौटुबिक जवाबदऱ्या असतील तर त्या पार पाडणे सोपे जाते.
आपला रोजगार कसा मिळवावा हा वैयक्तिक निर्णय असतो मात्र पूर्णवेळ Share Market चा निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करणे योग्य ठरते. त्यातल्या जोखीम , आपल्यावर असणाऱ्या आर्थिक जवाबदऱ्या यांचा विचार करणे देखील गरजेचे असते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)