What are passenger rights for delayed flight: देशात बहुतेक ठिकाणी वातावरण खराब असले की विमान उड्डाण होण्यास उशीर होतो किंवा एखादयावेळी विमान रद्द ही केले जाते. अशा वेळी प्रवाशांना टेंशन येते की, आता काय करायचे? विमानाने पहिलाच प्रवास असेल, तर मनात भिती निर्माण होते. पण अशा परिस्थितीत नो टेंशन! कारण विमान कंपनीकडून काही उड्डाणाच्या वेळेबाबत काय चूक झाली, तर प्रवाशांना काय अधिकार मिळतात, ते पाहुयात.
2019 मध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानास उशीर झाला किंवा रद्द झाले, तर प्रवाशांना काय अधिकार मिळणार आहे, याबाबत खुलासा केला आहे.
- एखादया विमानाला सहा तासापेक्षा अधिक उशीर होणार असेल, तर त्यांनी ते प्रवाशांना 24 तास पूर्वी कळविणे आवश्यक आहे.
- प्रवासी अधिक वेळ थांबण्यास तयार नसेल, तर विमान कंपनीने प्रवाशाला दुसऱ्या विमानाने पाठवावे किंवा तिकिटाचे पैसे परत द्यावे.
- एखादया विमानाला सहा तासापेक्षा अधिक उशीर झाल्यास, त्या विमान कंपनीने प्रवाशांची हाॅटेलमध्ये राहण्याची मोफत व्यवस्था करावी.
- जर विमानाला ठराविक वेळेपेक्षा अधिक उशीर झाला, तर प्रवाशांसाठी नाश्ता व जेवणाची मोफत सेवा दयावी.
- जर विमान रद्द होणार असेल, तर याची माहिती प्रवाशांना दोन आठवडयापूर्वी देणे आवश्यक आहे.
- जर प्रवासी थांबण्यास तयार नसेल, तर त्याला दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी किंवा त्याच्या तिकिटाचे पैसे पुन्हा दयावे.
- कनेक्टिंग फ्लाइट चुकणार असेल, तर तो ही खर्च त्या विमान कंपनीने दयावे.
- शक्यतो, ही भरपाई पाच ते दहा हजार दरम्यान असते. जर प्रवाशांनी कॅश पैसे दिले असेल, तर विमान कंपन्याला त्वरित पैसे परत करावे.
- जर प्रवाशांनी आॅनलाइन बुकिंग केले असेल, तर त्यांच्या बॅंक खात्यात साधारण एक आठवडयानंतर पैसे जमा केले जावे.