Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New BMW M2 Launched : BMW ने लाँच केलेल्या नवीन M2 ची किंमत आणि स्पीड जाणून घ्या

New BMW M2 Launched

Image Source : www.cardekho.com

BMW M2 : भारतात BMW चे अनेक चाहते आहेत, त्यामुळे कंपनी भारतात BMW चे वेगवेगळे मॉडेल घेऊन येत आहेत. BMW ने भारतात M2 लाँच केली. ही गाडी बीएमडब्ल्यूच्या सेकंड जनरेशनसाठी लाँच करण्यात आली आहे. या गाडीची किंमत एक्स-शोरुम 98 लाख रुपयांपासून सुरु होते.

 New BMW M2 Launched In India : BMW ने भारतात M2 लॉन्च केली आहे, त्याची किंमत 98 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यामध्ये टू-डोर स्पोर्ट्स कूपला ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह सिंगल वेरिएंट मध्ये सादर केल्या गेले आहे.  मात्र, मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय म्हणून ठेवण्यात आला आहे. BMW  M2 मध्ये 3.0 लिटर स्ट्रेट सिक्स इंजिन आहे,  जे M3 आणि M4 ला देखील पॉवर देते. हे इंजिन 460hp आणि 550Nm पॉवर जनरेट करते.

एक्स-शोरुम किंमत 98 लाख रुपये

नवीन BMW M2 ची किंमत पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी एक्स-शोरुम 98 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच, अतिरिक्त 1 लाख रुपये देऊन मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट देखील निवडता येईल. म्हणजेच 99 लाख रुपये देऊन तुम्ही ही गाडी खरेदी करु शकता. BMW M2 भारतात सीबीयू (Completely Built Unit) म्हणून आयात केली जाते.

किती स्पिड देते?

BMW चा दावा आहे की, नवीन M2 फक्त 4.1 सेकंदात (With Automatic Gearbox) 0-100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

भारतीय BMW M2 मध्ये स्टँडर्ड कम्फर्ट, ऍक्सेस सिस्टीम मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट्स, M सीट बेल्ट्स, हाय बीम असिस्टसह अॅडाप्टिव्ह एलईडी हेडलॅम्प, हरमन कार्डन साउंड सिस्टीम, BMW कनेक्टेड पॅकेज, वायरलेस चार्जिंग, फ्रंट लाइट 19 इंच अलॉयमध्ये सिल्व्हर फिनिश एम चाके आणि मागील बाजूस 20 इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

M2 पाच पेंट शेड पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये अल्पाइन व्हाईट, ब्रुकलिन ग्रे, ब्लॅक सॅफायर, टोरंटो रेड आणि झंडवूर्ट ब्लू यांचा समावेश आहे. आतील बाजूस, ब्लॅक किंवा कॉग्नाक शेड्सचा पर्याय असेल तर BMW M स्पोर्ट सीट्स डॅशबोर्डवर अॅल्युमिनियम हायलाइट्ससह असतील. नवीन BMW M2 भारतातील Porsche 718 Cayman ला टक्कर देईल.