Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lifestyle of India's Rich : ‘अशी’ आहे भारतातील श्रीमंतांची लक्झरी लाईफस्टाईल

Lifestyle of India's Rich

Image Source : www.amuse.vice.com

लक्झरी लाईफस्टाईलसाठी भारतातील श्रीमंत करोडो रुपये खर्च करतात हे त्यांनी निवडलेल्या ब्रँण्ड्सवरून लक्षात येते. श्रीमंत लोकांच्या सवयी आणि खर्च करण्याच्या पद्धतींवर (Lifestyle of India's Rich) लक्ष ठेवणारी हुरुन इंडियाने (Hurun India Report) अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये आढळून आलेल्या बाबी पाहूया.

केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील श्रीमंत लोकांच्या सवयी आणि खर्च करण्याच्या पद्धतींवर लक्ष ठेवणारी हुरुन इंडिया (Hurun India) अनेक वेळा संशोधन अहवाल प्रकाशित करते. हुरुन इंडियाच्या संशोधन अहवालात जगभरातील श्रीमंत लोक आपला पैसा कसा खर्च करतात किंवा गुंतवतात (Lifestyle of India's Rich) हे सांगितले जाते. अलीकडेच, हुरुन इंडियाकडून एक अहवाल आला आहे ज्यामध्ये भारतातील 350 उच्चभ्रू आणि 42 उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींशी चर्चा करण्यात आली आहे. भारतीय अब्जाधीशांमध्ये 7 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा समावेश होतो आणि एचएनआयमध्ये 100 कोटींहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्यांचा समावेश होतो.

शहरांनुसार श्रीमंतांची संख्या

हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, असे आढळून आले आहे की भारतात 7 कोटींहून अधिक संपत्ती असलेले 4.5 लाख लोक राहतात. हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, मुंबईत 20,000 श्रीमंतांची संख्या आहे, तर दिल्लीत 17,000 आणि कोलकात्यात 10,000 आहेत.

गुंतवणूकीत श्रीमंतांची ही पसंद

भारतातील श्रीमंत लोक त्यांच्या गुंतवणुकीत रिअल इस्टेटला प्राधान्य देतात, त्यानंतर ते शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील श्रीमंतांना मर्सिडीज-बेंझ ही त्यांची आवडती कार आहे. यानंतर श्रीमंतांच्या पसंतीत रेंज रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील श्रीमंत लोकांना रोल रॉयस आणि लॅम्बोर्गिनी खरेदी करायची आहे. ताज हॉटेल हे भारतातील उच्चभ्रू लोकांसाठी सुट्टीसाठी, जेवणासाठी आणि मौजमजेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यानंतर त्यांना ओबेरॉय आणि लीलासारखी हॉटेल्स आवडतात.

श्रीमंत व्यक्तीकडे किमान चार लक्झरी घड्याळं

भारतातील श्रीमंत लोकांबद्दल बोलायचे तर, रोलेक्स घड्याळे हा त्यांच्या पसंतीचा ब्रँड आहे. यानंतर ते Cartier आणि Ardre Mars Fuseo घड्याळ वापरतात. भारतातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तीकडे किमान चार लक्झरी घड्याळे आहेत. जर आपण भारतातील श्रीमंतांबद्दल बोललो, तर लुई व्हिटॉन हा त्यांचा आवडता लक्झरी ब्रँड आहे, त्यानंतर गुच्ची आणि बर्बेरीचा क्रमांक लागतो. तनिष्क ही भारतातील उच्चभ्रू लोकांसाठी सर्वात विश्वासार्ह दागिन्यांची कंपनी आहे. तर ओल्ड मंक हा भारतातील उच्चभ्रू लोकांमध्ये सर्वाधिक पसंतीचा दारूचा ब्रँड आहे.