Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Basic, Net आणि Gross Salary मधील फरक सोप्या शब्दात समजून घ्या

Component of Salary Structure

Image Source : www.digest.myhq.in

Salary Structure: बऱ्याच वेळा अनेकांचा ग्रॉस सॅलरी, बेसिक सॅलरी आणि नेट सॅलरी यामध्ये गोंधळ उडतो. आजच्या लेखातून हे सहज सोप्या भाषेत समजून घ्या.

Salary Structure : उद्या भारताचा आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) सादर करतील. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कर आणि कर सवलती यांचा आपल्या पगारावर काय परिणाम होतो हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  आपल्याला पगारातील घटक समजून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा अनेकांचा ग्रॉस सॅलरी, बेसिक सॅलरी आणि नेट सॅलरी यामध्ये गोंधळ उडतो. आजच्या लेखातून हे सहज सोप्या भाषेत समजून घेऊया.

तुम्ही नोकरी करत असाल तर, दर महिन्याला तुम्हाला Salary Slip मिळते. जिथे  तुम्हाला बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन(Basic Salary) आणि ग्रॉस सॅलरीची(Gross Salary) आकडेवारी देण्यात आलेली असते. या दोन्ही पगारांमध्ये नेमका फरक काय? हा प्रश्न कशी तुम्हाला पडलाय का?

ग्रॉस सॅलरी (Gross Salary)

बेसिक सॅलरी किंवा मूळ वेतनासोबत(Basic Salary) महागाई भत्ता, HRA, कन्वेयंस अलाउंस आणि इतर काही भत्ते व काही Deductions जोडून जी अंतिम रक्कम तयार होते तिला ग्रॉस सॅलरी(Gross Salary) म्हणतात. उदाहरणार्थ तुमचं मूळ वेतन 20,000 असेल, आणि यामध्ये 4,000 रुपये महागाई भत्ता आणि 9,000 रुपये HRA जोडल्यास तुमची ग्रॉस सॅलरी 33,000 रुपये होते.

नेट सॅलरी (Net Salary)

या दोन्ही प्रकारांव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे नेट सॅलरी(Net Salary). ग्रॉस सॅलरीतून कर, प्रोविडेंट फंड(Provident Fund) आणि इतर काही गोष्टी कमी केल्यास मिळणारी रक्कम ही नेट सॅलरी(Net Salary) असते. ही रक्कम महिन्याच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येते.

बेसिक सॅलरी (Basic Salary)

मूळ वेतन किंवा बेसिक सॅलरीवर कंपनी किंवा संस्था आणि कर्मचारी अशी दोघांचीही सहमती असते. Salary Structure मधील हा अतिशय महत्त्वाचा भाग असून बेसिक सॅलरीच्या प्रमाणात एकूण CTC च्या 40 ते 45 टक्के असते. यामध्ये HRA, Bonus, Tax Deductions, Overtime समाविष्ट केलेले नसतात.

सध्याच्या घडीला बेसिक सॅलरीची कोणतीही एक निर्धारित परिभाषा नाही. प्रत्येक संस्थेकडून सोयीनुसार पगाराची आकडेवारी ठरवली जाते. याचा फायदा त्या कंपन्यांना होतो. अनेकदा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन देण्यात येते त्यासोबत वाढीव भत्ते दिले जातात. पण हे मूळ वेतन कंपनीच्या सोयीनुसारच ठरवले जाते.