गृहकर्जातून मुक्त होणे ही प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही अनेक वर्षे काबाडकष्ट करून होम लोनचे हप्ते फेडतात. मात्र या कर्जाची रक्कम पूर्ण फेडल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो की हे कर्ज बंद कसे करावे व यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याची माहिती घेऊन तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे कर्ज अधिकृतरित्या बंद झाले, असे मानले जात नाही. यासाठी प्रत्येकाने हे कर्ज बंद झाल्याची खात्री केली पाहिजे. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे ताब्यात घ्या
- गृहकर्ज फेडल्यानंतर कर्जदार म्हणून तुम्हाला काही कागदपत्रे बॅंकेकडे आठवणीने जमा करावी लागतात.
- तसेच कर्ज काढताना बँकेकडे अनेक कागदपत्रांची मूळ प्रत जमा करावी लागते. ही कागदपत्रे पुन्हा घेणे गरजेचे आहे.
- खरेदी-विक्रीचा करार
- कर्जाचा करार
- पॉवर ऑफ अॅटर्नी
कर्ज फेडल्यानंतर ‘नो ड्यूज सर्टिफिकेट’ घ्या
गृह कर्जाची परतफेड केल्यानंतर 'नो ड्यूज सर्टिफिकेट' मिळवणे आवश्यक आहे. कारण हे प्रमाणपत्र मिळाल्यावर तुमच्याकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट होते आणि तुम्ही पुन्हा कर्ज घेण्यासाठी पात्र होता. तसेच कर्जदार बँक तुमच्या मालमत्तेवर अधिकार दाखवू शकत नाही. नो ड्यूज सर्टिफिकेटमध्ये (No Dues Certificate-NDC) तुमचा पत्ता, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम आणि कर्ज सुरू करण्याची आणि बंद करण्याची तारीख याचा उल्लेख असणे अनिवार्य आहे. कारण तुम्हाला ही मालमत्ता गहाण किंवा विकायची असेल, तर नो ड्यूज सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे.
क्रेडिट स्कोअर अपडेट करा
कर्जाची परतफेड केल्यानंतर क्रेडिट रेकॉर्ड अपडेट असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर अपडेट करण्यासाठी साधारणतः 20 ते 30 दिवस लागतात. म्हणून, कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला क्रेडिट रिपोर्ट मिळाल्याची खात्री करा आणि ते अपडेट केल्याची पडताळणी करा. जर तुमचा क्रेडिट स्कोअर बदलला नसेल, तर बँकेशी संपर्क साधा.
कर्ज फेडल्यानंतर बँक स्टेटमेंट मिळवा
भविष्यात उद्भवणारी कोणतीही समस्या टाळण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडल्यानंतर त्याचे स्टेटमेंट मिळवणे महत्त्वाचे आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सर्व स्टेटमेंट न मिळाल्यास तुमच्या कर्जाची परतफेड झाली याची शाश्वती मिळणार नाही.