Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kitchen Makeover: माहित करून घ्या, किचनचा मेकओव्हर करण्यासाठी काही महत्वाच्या वस्तू

Kitchen

Kitchen Makeover: मॉड्युलर किचन (Modular kitchen) असल्याने आता किचनकडे इतके लक्ष दिले जात नाही परंतु ते सुंदर आणि आकर्षक बनवणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी काही महत्वाच्या वस्तु कोणत्या ते माहित करून घ्या.

Kitchen Makeover: प्रत्येकाला वाटतं की आपलं घर शोभनीय दिसावं, त्यासाठी अनेक गोष्टी सुद्धा प्लॅन केलेल्या असतात. काही वेळ प्लॅन केलेल्या वस्तु आपल्याला परवडण्यासारख्या नसतात. काही तरी तडजोड करून आपण संपूर्ण घर तर सजवून (Home Decoration) घेतो परंतु किचनकडे दुर्लक्ष केले जाते. किचनही सुंदर आणि आकर्षक बनवायचे असेल तर काही वस्तु तुम्ही किचनमध्ये घेऊ शकता. मॉड्युलर किचन (Modular kitchen) असल्याने आता त्याकडे इतके लक्ष दिले जात नाही परंतु किचनही सुंदर आणि आकर्षक बनवणे फार महत्वाचे आहे. त्याशिवाय किचनमध्ये प्रसन्न वाटत नाही. 

किचनचा मेकओव्हर करण्यासाठी काही महत्वाच्या वस्तु (Some important items for a kitchen makeover)

  • मातीची भांडी
  • उसाच्या टोपल्या
  • स्पाइस स्टँड
  • टिन स्टोरेज बॉक्स
  • फ्रीज मॅग्नेट
  • काचेच्या बाटल्या

मातीची भांडी (Pottery)

फ्रीज आणि एसीच्या काळात मातीच्या वस्तु, भांडी म्हणजे थोडं विचित्र वाटेल पण महत्वाचे आहे. मातीची भांडी तुमच्या किचनला खूप सुंदर बनवते. शिजवलेले अन्न काढण्यासाठी मोठ्या सर्व्हिंग वाट्या, तवा किंवा भांडी यांसारख्या वस्तू मातीपासून बनवल्या जाऊ शकतात. त्यासोबत तुम्ही निळ्या पॉटरी प्लेट्स आणि लाकडी ट्रे देखील खरेदी करू शकता. या सर्व वस्तु तुमच्या किचनला शोभनीय आणि आकर्षक बनवते. 

स्पाइस स्टँड (Spice stand)

आपल्या किचनमध्ये तिखट, मीठ, जिरे ठेवण्यासाठी आपण स्टीलचा डबा वापरतो, त्यात लहान वाट्या आणि चमचे असतात. पण काही वेळा त्या डब्यात सर्व एकत्र होऊन जातं आणि मग त्यातील पदार्थ वापरतांना त्रास होतो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी स्पाइस स्टँड हे बेस्ट ऑप्शन असू शकते. यामुळे तुम्हाला सोईस्कर होणयासोबतच जागा सुद्धा कमी जाते. 

टिन स्टोरेज बॉक्स (Tin storage box)

बहुतेक लोक चहा, साखर, मीठ या सर्व गोष्टी स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवतात. चहा आणि साखर सोबतच स्नॅक्स आणि बिस्किट ठेवण्यासाठी तुम्ही टिन स्टोरेज बॉक्स किंवा कंटेनर आणू शकता, जे तुमच्या किचनला आकर्षक लुक देईल. जर तुम्हाला यावर खर्च करायचा नसेल तर तुम्ही घरातील जुन्या डब्यांना पेपर, नवनवीन प्रकारचे रंगीत पेपर लावून सजवू शकता. 

काचेच्या बाटल्या (Glass bottles)

सध्या सगळीकडे पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करण्यायोग्य साहित्य वापरण्यावर भर दिला जात आहे. फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी असो किंवा कोणत्याही वापरासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांच्या तुलनेत रंगीबेरंगी काचेच्या बाटल्या केवळ दिसायलाच सुंदर नसतात तर तुमच्या किचनला एक आकर्षक लुक देतात. त्यांचा वापर करताना तुम्हाला थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. इतकेच नाही तर तुम्ही मोठे ग्लास वॉटर डिस्पेंसर देखील आणू शकता, जे आजकाल ट्रेंडमध्ये आहेत.

उसाच्या टोपल्या (Sugarcane baskets)

तुमच्या किचनला नीटनेटके आणि आकर्षक लूक देणारी पुढील गोष्ट म्हणजे उसाच्या टोपल्या. बहुतेक घरांमध्ये भाजीपाला आणि फळे ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या टोपल्या असतात. बटाटे आणि कांदे, ज्या काही दिवसांनी ठिकठिकाणी फिकट होतात किंवा तडकतात. त्याऐवजी उसाच्या टोपल्या वापरा, त्या सुंदर दिसतील आणि स्वयंपाकघरही सुंदर बनवेल.