Mahindra Thar RWD: भारतात महिंद्राने ग्राहकांसाठी Mahindra Thar RWD (रियर-व्हील ड्राइव) ही कार अधिकृतपणे बाजारात लाँच केली आहे. या थारच्या नवीन गाडीची डिलिव्हरी 14 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. Mahindra Thar RWD ही कार D117 CRDe इंजिनसोबत विक्रीसाठी तयार आहे. जे 117 BHP चे पॉवर आणि 300 Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत येते. mStallion 150 TGDi इंजिन सोबत पेट्रोल इंजिन सुद्धा दिले गेले आहे. जे 150 BHP आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत जोडले आहे. ही कार दोन कलरमध्ये येणार आहे.
कारची किंमत (The Price of the Car)
यापूर्वी Thar 4WD एसयूव्हीला 2022 मध्ये लाँच करण्यात आले होते. ही एसयूव्ही आता एक अडवॉन्स्ड इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॅाकिंग डिफरेंशियल सोबत येते. परंतु, 4WD आणि RWD या दोन कारच्या किंमतीत मोठा फरक आहे. सर्वात स्वस्त थार डिझेल AX(O) 4X2 MT ची किंमत 9.99 लाख रुपये असून, जी थार डिझेल एसी (ओ) 4X4 MT गाडीच्या तुलनेत जवळपास 4.15 लाख रुपये स्वस्त आहे. याची किंमत 13.15 लाख रुपये आहे. या गाडयाच्या किंमती पुढीलप्रमाणे: AX (O) RWD-Diesel MT- Hard top ची किंमत 9.99 लाख रुपये, LX RWD-Diesel MT-Hard top ची किंमत 10.99 लाख रुपये, LX RWD-Petrol AT-Hard top ची किंमत 13.40 लाख रुपये इतकी आहे.
फीचर्स (Features)
महिंद्रा थार एसयूव्हीची ही नवीन गाडी हार्ट टॉप व्हर्जनमध्ये बाजारात आली आहे. ही इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, रोल ओव्हर मिटिगेशन सोबत ईएसपी आणि रियर व्हील ड्राइव्ह कारसाठी खास हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे सुरक्षिक फीचर्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे. व्हील साइज 16 इंच स्टील ऑल किंवा 18 इंच अलॉयचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.