• 09 Feb, 2023 08:46

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फक्त 10 वी पास, पण सेलिब्रिटींना साडी नेसविण्यासाठी तगडे मानधन घेते; नीता अंबानीपासून ते दिपिका पदुकोनपर्यंत...

Who Wears Sarees to Bollywood Celebrities

Image Source : http://www.newscrab.com/

Who is Dolly Jain: आजकाल प्रत्येक क्षेत्रात प्रचंड पैसा आहे. आता हेच बघा साडी नेसविणे हा देखील एक व्यवसाय बनला आहे. खरयं.. डॉली जैन नावाची महिला फक्त दहावी पास आहे. ती बाॅलिवुड सेलेब्रिटींना साडी नेसविण्याचे काम करते. ती यासाठी किती मानधन घेते, पाहूयात.

Who Wears Sarees to Bollywood Celebrities: बाॅलिवडमध्ये अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) पासून ते दिपिका पदुकोन (Deepika Padukone) पर्यंत सर्वच अभिनेत्रींना डॉली जैन (Dolly Jain) ही महिला साडी नेसविते. ती साधारण 325 प्रकारच्या साडया नेसविण्याचे काम करते. नुकतेच अनंत अंबानी (Anant Ambani) व राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या साखरपुडयातदेखील तिने नीता अंबानी (Nita Ambani) व राधिका मर्चंट यांना साडी नेसविण्याचे काम केले आहे. ती या कामाचे किती मानधन घेते हे जाणून घेवुयात.

अंबानी कुटुंबातील सदस्यांना नेसविते साडी (Ambani Family Members Wear Sarees)

कोलकत्ता येथील डॉली जैन ही नीता अंबानी यांचे साडी ड्रेपिंग अत्यंत प्रोफेशनलपणे करते. ईशा अंबानीपासून ते श्लोका मेहता, राधिका मर्चंतपर्यंत ती साडी ड्रेपिंग करते. विशेष म्हणजे ईशा अंबानींच्या लग्नातदेखील डॉलीनेच अंबानी कुटुंबातील महिला सदस्यांना साडी नेसवली होती. तसेच लहेंगादेखील ड्रेप केला होता. तसेच टीना अंबानी यांनादेखील सण-सोहळयादिवशी साडी नेसविण्याचे काम करते. ही एक साडी नेसविण्यासाठी साधारण 35 हजारापासून ते लाखो रूपये इतके मानधन घेते.  

साडी नेसविण्याचा केला रेकॉर्ड (A Record For Wearing A Saree)

डॉलीने कमी वेळात साडी नेसविण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासाठी तिच्या नावाचा समावेश लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आला आहे. तिने साधारणपणे एक साडी अठरा सेकंदात नेसविण्याचा रेकॉर्ड केला आहे. डॉली जैन ही  सब्यासाची मुखर्जी आणि मनिष मल्होत्रासारख्या पॉप्युलर डिझायनर्सच्या क्लाइंट्सलादेखील साडी नेसवते. डॉलीची साडी नेसविण्यासाठी खूप मोठी टीम आहे. हाय प्रोफाइल लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात हीच फी लाखो रुपयांपर्यंत घेत असल्याचे तिने सांगितले आहे.