iQoo 11 5G SmartPhon Prize: भारतात सध्या मोबाईल वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीपेक्षा ही संख्या अफाट वाढली आहे. आता, तर प्रत्येक कुटूंबातील प्रति व्यक्तीकडे एक मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे मोबाईलला मागणी अधिक असल्याने, बाजारातदेखील अधिक मोबाईल धमाकेदार एन्ट्री करत असतात. अशातच एक iQoo 11 5G हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे, या मोबाईलची किंमत व फीचर्स सविस्तरपणे जाणून घेऊयात.
iQoo 11 5G स्मार्टफोनबाबत
2023 या नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच iQoo 11 5G हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत आहे. कंपनीने मागच्या महिन्यात भारतात आगामी iQoo 11 5G या स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर करण्यात आली होती. आज हा फोन लॉन्च होत आहे. iQoo 11 सीरिज अंतर्गत iQoo 11 आणि iQoo 11 Pro हे दोन स्मार्टफोन आहेत. सध्या भारतात फक्त iQoo 11 लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या मोबाईलची डिलिव्हरी भारतात 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. iQoo 11 हा फोन लेजेंड आणि अल्फा अशा दोन ऑप्शनमध्ये उपलब्ध असून लेजेंड एडिशनमध्ये प्रसिद्ध ऑटो कंपनी BMW मोटरस्पोर्ट थीम वर आधारित असणार आहे.
मोबाईलचे फीचर्स (Mobile Features)
या मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या प्रोसेसरसह भारतात येणारा हा सर्वांत शानदार फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये Vivo चा नवीन V2 चिपसेटचा समावेश आहे. iQoo 11 मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे युजर्सना आणखी स्मूथ टचस्क्रिनचा वापर करता येणार आहे. समोर येणाऱ्या काही रिपोर्ट्सनुसार iQoo 11 कंपनीच्या OxygenOS वर स्वतःच्या लेयरसह Android 13 हा व्हर्जन असण्याची शक्यता आहे.
मोबाईल किंमत (Mobile Prize)
iQoo 11 5G या स्मार्टफोनची किंमत रिपोर्ट्सनुसार 50,000 ते 60,000 रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. आधुनिक फीचर्ससह हा मोबाईल आज भारतात दमदार एन्ट्री करीत आहे.