What car is Used by the President of India: देशात काल मोठया प्रमाणात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा ही राजपथवरील परेड व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उपस्थित होत्या. यावेळी त्या ज्या गाडीने पोहोचल्या होत्या, त्या गाडीची अधिक चर्चा झाली. त्यांच्या या आलिशान गाडीची किंमत व फीचर्स जाणून घेवुयात.
कारचे नाव, किंमत व फीचर्स
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या कारचे नाव ‘एस 600 पुलमॅन गार्ड लिमोजिन’ (Mercedes-Benz S600 Pullman Guard) असे आहे. ही कार मर्सिडीज कंपनीची आहे. या कारची किंमत सुमारे 10 कोटी रूपये आहे. ही जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक कार आहे. कारण या कारवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तरी त्याचा या कारवर काहीच परिणाम होत नाही. ही कार कधीच पंक्चर होत नाही. विशेष म्हणजे ही गाडी 8 सेकंदात 100 किमीचा वेग पकडू शकते.
कारवर स्फोटाचा परिणाम होत नाही
राष्ट्रपती या देशाच्या पहिल्या नागरिक असतात. तसेच त्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुखदेखील असतात. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी खास ही कार तयार करण्यात आली आहे. या गाडीमध्ये प्रत्येक टेक्नोलाॅजीचे फीचर्स हे अव्वल आहेत. राष्ट्रपतींची सुरक्षा ही देशासाठी सर्वात महत्वाची मानली जाते. त्यामुळे याकडे खास लक्ष दिले जाते. त्यांची ही कार इतकी सुरक्षित असते की, त्यांच्या या Mercedes-Benz S600 Pullman Guard कारवर स्फोट जरी झाला, तर त्याचा यावर काहीच परिणाम होत नाही. विशेष म्हणजे AK 47 मधून जरी गोळया झाडल्या तरी कारला काहीच होत नाही. गाडीमध्ये बसलेली व्यक्ती ही पूर्ण सुरक्षित राहते.