Hrithik Roshan: बॉलिवुडला मै प्रेम की दिवानी हू, मुझसे दोस्ती करोगें, धूम (Dhoom) अशी एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारा हा अभिनेता आज ही प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करत आहे. मागील काही दिवसांपासून सुजैन खान (Sussanne Khan) सोबतच्या घटस्फोटानंतर तो आपल्यापेक्षा बारा वर्षाने लहान असलेली गर्लफ्रेंड सबा आझाद ( Saba Azad) सोबत खूप चर्चेत आला आहे. आपल्या करियरमध्ये अनेक संघर्षानंतर ही प्रेक्षकांच्या मन जिंकणाऱ्या या अभिनेत्याच्या कमाईबाबत पाहूयात.
Table of contents [Show]
हृतिक रोशनची एकूण संपत्ती (Hrithik Roshan Net Worth)
हृतिक रोशनची आजपर्यंतची एकूण संपत्ती 3101 कोटी रुपये आहे. त्याचे मासिक उत्पन्न सुमारे 20 कोटीपेक्षा अधिक आहे. याशिवाय हृतिकने मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर दोन आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. ज्याची किंमत सुमारे 97.50 कोटी रुपये आहे. हे दोन्ही अपार्टमेंट 38,000 स्क्वेयर फूटमध्ये पसरलेले आहेत.
लग्झरी गाडींचा शौकीन (Luxury Car's Enthusiast)
ऋतिक रोशनला लग्झरी गाडयांचा खूप शौक है. त्याच्या जवळ फेरारी, वॉल्वो, ऑडी और मर्सेडीज कंपनींच्या ब्रॅंडेड गाडया आहेत. अॅक्टिंग व्यतिरिक्त तो खूपसाऱ्या नामांकित कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसिडरदेखील आहे. त्याने क्लोदिंग लाइन देखील लॉन्च केली आहे.
कुटुंबाकडे 5000 कोटींची संपत्ती (5000 Crores of Wealth with the Family)
हृतिकच्या वडिलोपार्जित संपत्तीबद्दल बोलायचे तर त्यांच्याकडे 5 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांचे दिल्ली, मुंबई, बंगळुरू येथे अनेक आलिशान अपार्टमेंट आणि बंगले आहेत. तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या मुंबईतील घराची बाजारातील किंमत 84 कोटी रुपये आहे.
सुपरहिट चित्रपट (Superhit Movies)
गेल्या दोन दशकात हृतिकचे 'कभी खुशी कभी गम', 'कोई मिल गया', 'क्रिश', 'गुजारिश', 'काबिल', 'बँग बँग', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'सुपर 30' आणि 'वॉर' सारखे सुपर हिट चित्रपट त्याने केले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत आणि भारतातील सर्वात आकर्षक पुरुष सेलिब्रिटींमध्येदेखील त्याचा समावेश करण्यात आला होता.